बाबासाहेबांच्या शिवसृष्टीची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेला (Shivsena) कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे वक्तव्य देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
Pune : बाबासाहेबांच्या शिवसृष्टीची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे
Pune : बाबासाहेबांच्या शिवसृष्टीची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार - एकनाथ शिंदेSaamTV

पुणे : शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या घरी सांत्वपर भेट देण्यासाठी आज पुण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले 'पुरंदरेंच्या निधनाने न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शिवचरित्र त्यांनी घराघरात पोहोचवलं जाणता राजा च्या माध्यमातून देश विदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पोहचल्याचे ते म्हणाले.

हे देखील पहा -

दरम्यान, आपण काल पहाटे परभणीला (Parbhani) गेल्याने अंत्यदर्शनासाठी येऊ शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाबासाहेबांच्या शिवसृष्टीची संकल्पना (The concept of Shivsrishti) पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

Pune : बाबासाहेबांच्या शिवसृष्टीची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे
Sangali : बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत संभाजी भिडेंनी वाहिली श्रद्धांजली

भाजपकडून BJP भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत यावरती देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, 'हे आरोप नवीन नाही, जेव्हापासून सरकार स्थापन झालं, तेव्हापासून हे आरोप होत आहेत. कोविडचे संकट (Covid-19) नैसर्गिक संकट येत आहेत मात्र कुठेही पॅकेज कमी पडू दिले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चांगले काम करत असून त्याचा गौरव थेट सर्वोच्च न्यायालयाने आणि खुद्द पंतप्रधानानी (PM) केला असल्याच ते म्हणाले तसेचशिवाय विरोधकांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सेनेवरती टीका करणाऱ्यांना त्यांना शिवसेनेला (Shivsena) कोणी हिंदुत्व (Hindutva) शिकवण्याची गरज नसल्याचा सल्ला देखील त्यांनी विराधी पक्षाला दिला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com