WhatsApp Update : इंटरनेटशिवाय चालणार व्हॉट्सॲप?; जाणून घ्या नवीन अपडेट

प्रत्येकाला इंटरनेट नसतानाही व्हॉट्सॲप वापरता येणार आहे.
WhatsApp Update
WhatsApp UpdateSaam TV

WhatsApp Update : सध्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सॲप वापरतो. आतापर्यंत यात अनेक बदल होत अपडेट आले आहेत. युजर्सना व्हॉट्सॲप वापरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हे अपडेट करण्यात आले आहेत. अशात अजूनही व्हॉट्सॲप वापरताना इंटरनेटची आवश्यकता आहे. मात्र लवकरच व्हॉट्सॲप एक प्रॉक्सी फीचर घेऊन येत आहे. यात प्रत्येकाला इंटरनेट नसतानाही व्हॉट्सॲप वापरता येणार आहे. (Latest WhatsApp Update)

काय आहे प्रॉक्सी फीचर

इंटरनेट व्यक्तिरिक्त व्हॉट्सॲप वापरणे कठीण आहे. त्यामुळे अशावेळी प्रॉक्सी फीचरचा फायदा होणार आहे. या फिचारचा वापर करताना कोणताही बदल न होता तुमचे मॅसेज दिसतात. तसेच तुम्ही सेट केलेली प्रायवसी आहे तशीच राहते. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मॅसेजसह कॉल देखील मिळतात. येत्या काही दिवसात हे फीचर सुरू होण्याची शक्यता आहे.

आजही अनेक देशांमध्ये व्हॉट्सॲप वापरले जात नाही. तसेच अतिदुर्गम आणि खेड्यापाड्यात देखील इंटरनेटची सुविधा नसल्याने तेथील व्यक्तींना देखील व्हॉट्सॲप वापरता येत नाही. अशा व्यक्तींसाठीच व्हॉट्सॲपने प्रॉक्सी फीचर सुरू करण्याचा विचार केला आहे.

WhatsApp Update
"I MISS YOU, MY LOVE" व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

असे करा प्रॉक्सी कनेक्ट

प्रॉक्सी कनेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही एक सर्चइंजिन असणे गरजेचे आहे. तसेच सुरुवातीला तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता आहे. यात कोणत्याही एका सर्चइंजिनवर तुम्हाला प्रॉक्सी करणाऱ्या ॲपची आवश्यकता असेल. ते ॲप शोधल्यावर तुमचे व्हॉट्सॲप लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करावे. त्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये चॅटबॉक्समध्ये मोअर ऑप्शन निवडून सेटिंगवर क्लिक करावे.

WhatsApp Update
Jalgaon News : व्हॉट्सॲप स्टेटसवरून दोन गटात तुफान राडा

व्हॉट्सॲप अपडेट झाले असल्यास तुम्हाला प्रॉक्सी असा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून पुढे तुमच्या ॲपचा प्रॉक्सी नंबर तेथे टाकावा. व्हॉट्सॲप प्रॉक्सी सेट झाल्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन किंवा चेकमार्क द्वारे समजेल. या अपडेटचा अनेक युजर्सना फायदा होणार आहे. अगदी खेड्यापाड्यात देखील व्हॉट्सॲप वापरणे सोईचे होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com