Pune Breaking : कपडे वाळत घालताना तोल गेल्याने आठव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू!

इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या गॅलरीत कपडे वाळू घालत असताना एका 50 वर्षीय महिलेचा तोल गेला आणि ती महिला थेट खाली पडली. अतिशय उंचावरून पडल्यामुळे या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.
Pune Breaking : कपडे वाळत घालताना तोल गेल्याने आठव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू!
कपडे वाळत घालताना तोल गेल्याने आठव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू! SaamTv

पुणे : इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या गॅलरीत कपडे वाळू घालत असताना एका 50 वर्षीय महिलेचा तोल गेला आणि ती महिला थेट खाली पडली. अतिशय उंचावरून पडल्यामुळे या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना पुण्यातील आंबेगाव खुर्द मधील दत्तनगर भागात असलेल्या बहुमजली लेकवुड या सोसायटीत घडली आहे.

हे देखील पहा :

मृत्यू झालेल्या महिलेचे नाव केसरीदेवी हरिजी सिंग असे आहे. मूळ उत्तरप्रदेशातील असणाऱ्या केसरीदेवी सिंग यांच्या मुलाचे लेकवुड सोसायटीत आठव्या मजल्यावर घर आहे. त्यांचा मुलगा आणि सून पुण्यात एका कंपनीत नोकरीस आहेत. केसरीदेवी आपल्या मुलाला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आल्या होत्या. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या कपडे वाळू घालण्यासाठी गॅलरीत गेल्या. मात्र, कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली पडल्या. अचानकपणे घडलेल्या या दुर्घटनेमुळे लेकवुड सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली.

कपडे वाळत घालताना तोल गेल्याने आठव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू!
Crime : जमिनीचा वाद, मित्रांच्या मदतीने केली चुलत भावाची निर्घृण हत्या!

दरम्यान, केसरीदेवी यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला व या प्रकरणी नोंद केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com