Mumbai Breaking : मुंबईतील साकीनाक्यात महिलेवर बलात्कार! [व्हिडीओ]

मुंबईमधील साकीनाका परिसरात आज सकाळी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेत महिलेच्या गुप्तांगात घालून रॉडसारखी वस्तू घालून महिलेला जखम पोहचवल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Breaking : मुंबईतील साकीनाक्यात महिलेवर बलात्कार!
Mumbai Breaking : मुंबईतील साकीनाक्यात महिलेवर बलात्कार!SaamTv news

मुंबई : महाराष्ट्रातील महिला अत्याचाराचे सत्र काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी पुण्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराची प्रकरणे ताजी असतानाच आज सकाळी मुंबई मध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबईमधील साकीनाका परिसरात आज सकाळी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेत महिलेच्या गुप्तांगात घालून रॉडसारखी वस्तू घालून महिलेला जखम पोहचवल्याची माहिती समोर आली आहे. अमानुषपणे या महिलेवर छळ करून हा बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. मोहन चव्हाण (वय ४०) असे या आरोपीचे नाव आहे.

Mumbai Breaking : मुंबईतील साकीनाक्यात महिलेवर बलात्कार!
Breaking Solapur : काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांसह 12 जणांवर गुन्हे दाखल

दरम्यान, महिलेवर सामुहिक बलात्कार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर महिलेच्या गुप्तागांत राँडसारखी वस्तू ने महिलेला जखमी केल्यामुळे महिलेची प्रकृती नाजूक असून तिला तातडीने शासकिय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com