चेतन इंगळे
वसई विरार : वसईच्या Vasai पश्चिमेच्या भुईगाव सागरी किनारी सुटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत वसई पोलिसांनी Police मृतदेह ताब्यात घेवून पुढील तपास सुरु केला आहे.
हे देखील पहा-
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी सकाळी भुईगाव समुद्र किनारी वाहून आलेल्या एका सुटकेस मध्ये ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. यात मृत महिलेचे डोकं च नाही आहे. तर पाण्यामुळे मृतदेह कुजला असल्याने याची ओळख पटणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. पोलिसांनी अज्ञात इसमांच्या विरोधात हत्तेचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली.
वसईच्या सागरी किनारी हा महिनाभरातील चौथा मृतदेह आहे. या अगोदर वसईतील बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या नंतर एका इसमाचा मृतदेह सापडला होता.
Edited By-Sanika Gade
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.