पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर केतकी चितळेवर शाईफेक
Actress Ketaki Chitale SAAM TV

पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर केतकी चितळेवर शाईफेक

केतकी चितळेला ठाणे पोलीस ताब्यात घेत असताना काही महिलांनी शाईफेक केली आहे.

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस ताब्यात घेत असताना केतकी चितळेवर शाईफेक आणि अंडी फेक झाली आहे. केतकी चितळेला ठाणे पोलीस (Police) ताब्यात घेत असताना काही महिलांनी शाईफेक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून अंडी आणि शाईफेक करण्यात आली आहे. ही घटना ठाण्याच्या कळंबोली पोलीस ठाण्याच्या बाहेर घडली आहे.

Actress Ketaki Chitale
Ketki Chitale Arrest : केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात ; पाहा व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधातील आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी केतकी चितळेवर (Ketaki Chitale) चहुबाजूने टीका होत आहे. दुसरीकडे तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

नवी मुंबईत केतकी चितळेला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केतकी विरोधात ठाणे, पुणे आणि गोरेगाव याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. कळंबोली मधील आयवी लॉन्स प्लॉट नंबर ८८ सेक्टर १६ येथून ताब्यात घेतले. ठाणे पोलिस ताबा घेण्यासाठी कळंबोली स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत.

शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट शेअर केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढल्या आहेत. नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट तिने आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात संताप व्यक्त होत होता. या प्रकरणी केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.