दुबईहून मुंबई विमानतळावर उतरली महिला; अधिकाऱ्यांनी झडती घेतल्यानंतर हादरलेच

डीआरआयची कारवाई, ड्रग्जची तस्करी करणाऱ्या विदेशी महिलेला मुंबई विमानतळावरून 10 लाखांच्या ड्रग्जसह अटक
Mumbai Airport
Mumbai AirportSaam Tv

मुंबई - दुबईहून आलेल्या एका परदेशी महिलेला मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) लाखोंचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना या महिलेवर संशय आल्यामुळे त्यांनी महिलेला थांबवून तिची चौकशी केली. या दरम्यान, महिलेजवळ अंमली पदार्थ आढळून आले. महिलेने हे ड्रग्ज तिच्या पोटात लपवून आणले होते. चौकशी दरम्यान, महिलेच्या पोटातून तब्बल 214 ग्रॅम हेरॉईनचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत तब्बल 10 लाख रुपये आहे.

हे देखील पाहा -

DRI कडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून आलेल्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या बॅगची झडती घेतली असता तिच्याजवळ काहीही आढळून आले नाही. त्यानंतर तिच्या वैद्यकिय तपासणी केली असता तिच्या पोटात तब्बल 20 कॅप्सूल आढळून आल्या. त्या कॅप्सूलमध्ये हेरॉइन ड्रग्स असल्याचे समोर आले. या महिलेला काल न्यायालयात हजर केले असता,अधिक चौकशीसाठी महिलेला कोठडीत पाठवण्यात आले. हे ड्रग्ज नेमके कुठून आले आणि कोणाला देण्यात येणार होते? याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. महिलेच्या फोनचीही तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com