Anil Deshmukh | काल झालेला अनिल देशमुखांबाबतचा हाय व्होल्टेज ड्रामा, काय घडले मुंबईत (पहा व्हिडिओ)

बुधवारी डागा हे देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी सोबत देशमुखांच्या जप्त केलेल्या इमारत परिसरात असताना दोघांना ताब्यात घेतले आणि यानंतर सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
Anil Deshmukh | काल झालेला अनिल देशमुखांबाबतचा हाय व्होल्टेज ड्रामा, काय घडले मुंबईत (पहा व्हिडिओ)
Anil Deshmukh | काल झालेला अनिल देशमुखांबाबतचा हाय व्होल्टेज ड्रामा, काय घडले मुंबईत (पहा व्हिडिओ) Saam Tv

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर सध्या बदल्या आणि 100 कोटीच्या वसूलीचे आरोप लावण्यात आले. यानंतर देशमुखांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन यात सीबीआयनेही स्वतंत्र तपास सुरू केला.  सीबीआयने CBI या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुखांची 9 तास चौकशीही केली. या प्रकरणात सहभाग आढल्यानंतर सीबीआयने गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली. या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून मनीलाँड्रीग Money laundering झाल्याने ईडीने ही स्वतंत्र तपास करून गुन्हा नोंदवला. पुढे जाऊन ईडीने ED मनीलाँड्रींग प्रकरणी देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांना अटक केली. 

या दोघांच्या अटकेच्या कारवाई दरम्यान ईडीने अनिल देशमुखांनाही 5 समन्स बजावून ते उपस्थित न राहता वकिलांना पाठवून वेळ मारून नेली. या दरम्यान ईडीने देशमुखांच्या दोन मालमत्ताही जप्त केल्या, तर दुसरीकडे सीबीआयचा तपास सुरू असताना.  अचानक सीबीआयचे पोलीस उपायुक्त आर एस गुंजाल यांचा प्राथमिक अहवाल लिक झाला. या गोपनिय अहवालात देशमुख यांना दिलासा देण्यात आला होता. मात्र गोपनिय अहवाल माध्यमंध्येही पोहचल्याने सीबीआयने झाडाझडती सुरू केली.

Anil Deshmukh | काल झालेला अनिल देशमुखांबाबतचा हाय व्होल्टेज ड्रामा, काय घडले मुंबईत (पहा व्हिडिओ)
12 आमदारांच्या 'त्या' यादीत तालिबानी नव्हते - संजय राऊत (पहा व्हिडिओ)

त्यावेळी सीबीआयमधील पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनी हा अहवाल देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांपर्यंत पोहचवल्याचा आरोपावरून सीबीआयने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तिवारीला अटक केली. तिवारीच्या चौकशीत देशमुखांचे वकील आनंद डागा यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी डागा हे देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी सोबत देशमुखांच्या जप्त केलेल्या इमारत परिसरात असताना दोघांना ताब्यात घेतले आणि यानंतर सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा. अचानक घडलेल्या या प्रकरणानंतर देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान गौरव यांचा सहभाग नसल्याने सीबीआयने त्यांना सोडले.  मात्र डागा हे अजूनही सीबीआयच्या ताब्यात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com