चक्क! तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महिलांवर आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सतत घडत आहेत
चक्क! तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार; कारण ऐकाल तर व्हाल थक्क
चक्क! तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार; कारण ऐकाल तर व्हाल थक्क Saam Tv

कल्याण : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महिलांवर आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सतत घडत आहेत. यानंतर आता ठाणे Thane जिल्ह्यातील कल्याण Kalyan शहरात अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी विकृत घटना समोर आली आहे. कल्याण- पूर्व भागात एका तरुणीने चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार abuse केला आहे. आरोपी तरुणी एवढ्यावरच न थांबता तिने तर चक्क पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर प्रियकराद्वारे बलात्कार करण्यास भाग पाडले आहे.

हे देखील पहा-

कोळशेवाडी पोलीस kolshewadi police ठाण्याच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक आणि विकृत प्रकार घडला आहे. येथील एका २३ वर्षीय तरुणीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. ही विकृत तरुणी पीडित अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे. मागील काही महिन्यांपासून ही तरुणी पीडित अल्पवयीन मुलाचे जबरदस्तीने लैंगिक शोषण करत होती. तसेच घटनेची वाच्यता न करण्यासाठी आरोपी तरुणी अल्पवयीन पीडित मुलाला नेहमी धमकावत असत. म्हणूनच मागील काही महिन्यांपासून पीडित मुलाने या घटनेची वाच्यता कुठे देखील केली नाही.

चक्क! तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार; कारण ऐकाल तर व्हाल थक्क
डीजेच्या आवाजाने चक्क ६३ कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

आरोपी तरुणी एवढ्यावरच न थांबता,तिने चक्क आपल्या प्रियकराकडून पीडित अल्पवयीन मुलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर देखील लैंगिक अत्याचार करायला भाग पाडली आहे. या विकृत तरुणीच्या प्रियकराने देखील पीडित अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केले आहे. या घटनेची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत, अशी धमकी पीडित अल्पवयीन बहीण- भावाला दिली जात होती. यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर येत नव्हता.

अखेर भेदरलेल्या आणि आरोपींच्या अत्याचाराच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित अल्पवयीन भाऊ- बहिणीने मोठ्या हिंमतीने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी कुटुंबीयांना सांगितली आहे. यानंतर नातेवाईकांनी कल्याण पूर्वेमधील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेविषयी फिर्याद दिली आहे. अल्पवयीन भाऊ- बहिणीवर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी एकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी विकृत तरुण- तरुणी विरोधामध्ये कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com