Pune Police News: पोलीस दलात भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र देणारा तरुण अटकेत; चतु:शृंगी पोलिसांची कारवाई

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.
Chaturshrungi Police Station
Chaturshrungi Police StationSaam Tv

अक्षय बडवे

Pune News: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. सचिन वाघमोडे असे अटक करण्यात आलेल्या उमेदवाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. (Latest Marathi News)

Chaturshrungi Police Station
Vetal Tekdi Pune: वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ठाकरे गट अन् पर्यावरण प्रेमी एकत्र; ट्रेकचे आयोजन

वाघमोडे भरती प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई) प्रमाणपत्र सादर केले होते. भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू असताना वाघमोडेने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. (Pune News)

Chaturshrungi Police Station
New Parliament Building: नवीन संसद भवनाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक

त्यानंतर बीड (Beed) येथील तहसील कार्यालयात पोलिसांनी (Police)चौकशी केली. तेव्हा बीडमधील तहसील कार्यालयातून वाघमोडेला प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर वाघमोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com