अंबरनाथमध्ये तरुणाची खदानीत उडी मारून आत्महत्या

आत्महत्येपूर्वी कुटुंबियांना फोन करून दिली माहिती
अंबरनाथमध्ये तरुणाची खदानीत उडी मारून आत्महत्या
अंबरनाथमध्ये तरुणाची खदानीत उडी मारून आत्महत्याअजय दुधाणे

अंबरनाथ - एका तरुणानं खदानीत उडी मारून आत्महत्या Suicide केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबियांना फोन करून आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. अंबरनाथ Ambernath पश्चिमेच्या चिंचपाडा भागातील खदानीत ही घटना घडली. विनायक जाधव असं आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय तरुणाचं नाव होतं. विनायक हा अंबरनाथ पश्चिमेच्या हाऊसिंग बोर्ड परिसरात वास्तव्यास होता.

हे देखील पहा -

चिंचपाडा खदानीवर येऊन त्यानं खदानीत उडी मारली, यावेळी काही स्थानिकांनी त्याला उडी मारताना पाहिलं देखील होतं. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी विनायक याचा मृतदेह बाहेर काढून उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, विनायक यानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हे मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com