...अन् कुटुंबीयांसमोरच तरूण नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

अस्थी विसर्जन करण्यासाठी आलेला एक तरुण सीना नदीत बुडाला.
Solapur Taluka News
Solapur Taluka News Saam Tv

वडाळा : स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव दिनीच सोलापूर तालुक्यात एक भयंकर घटना घडली. काकांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी आलेला एक तरुण सीना नदीत बुडाला. या तरुणाला पोहता येत नव्हतं. त्यातच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नातेवाईकांच्या डोळ्यासमोर तरुण पाण्यात बुडाला. नातेवाईकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडही केली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. (Solapur Taluka Todays News)

Solapur Taluka News
VIDEO : आमदार संतोष बांगर यांनी थेट मॅनेजरच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं?

किशोर डिगाजी व्हटकर (वय 27) रा. हनुमान नगर सोलापूर असं नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. किशोर हा आपल्या काकांच्या अस्थी विसर्जन साठी आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास पाकणी (ता.उ.सोलापूर ) येथील सीना नदीवरील बंधाऱ्यात आला होता. त्यावेळी त्याचे कुटुंबीय तसेच नातेवाईकही त्याच्यासोबत होते.

अस्थी विसर्जन करण्यासाठी किशोर हाा सीना नदीतील पाण्याच्या उतरला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अस्थी विसर्जन करताना किशोरचा तोल गेला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोघांनी हात दिला मात्र त्यामधूनही तो निसटला. किशोरला पोहता येत नव्हते. नातेवाईकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. आरडाओरड केली मात्र पाण्याचा प्रवाह ठिकठिकाणी वाळु उपश्यामुळे पडलेले खड्डे यामुळे तो पाण्यात बुडाला. (Solapur Taluka News)

Solapur Taluka News
नवऱ्याने कपाटात ठेवलेली दारू बायकोनं संपवली; त्यानंतर घडलं भयंकर

यावेळी घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी चिंचोळी औद्योगिक वसाहती मधील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशामक कर्मचारी व अधिकारी यांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने तब्बल ३ तास शोध घेऊनही किशोर आढळून आला नाही.

दरम्यान, पोलिसांनी शोध मोहीम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.यावेळी सोलापूर तालुका पोलीस पो.कॉन्स्टेबल पवन महिंद्रकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र पाण्याचा वाहता प्रवाह व सार्वजनिक सुट्टी मुळे NDRF टीम अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

वाळू उपश्याचा बळी?

पाकणी शिवणी परिसरात बेकायदेशीर वाळू उपश्यामुळे सीना नदीत ठिकठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. यामुळे हे खड्डे स्थानिक नागरिकांच्या जिवावर उटलेत. याकडे उत्तर सोलापूर महसुल विभाग डोळेझाक करीत आहे. यामुळे प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com