तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, तीन दिवसांनी बिंग फुटलं

याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी दोन मुली आणि एका मित्राला ताब्यात घेतले आहे. सोबत असलेला पाचवा मित्र रिक्षा ड्रायव्हर असून तो फरार झाला आहे.
तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, तीन दिवसांनी बिंग फुटलं
तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, तीन दिवसांनी बिंग फुटलंSaam Tv

शहापूर : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह माहुलीच्या धबधब्यात तरंगताना आढळून आला आहे. 18 वर्षीय धीरज माळीसह तीन तरुण आणि त्यांच्या दोन मैत्रिणी असे एकूण 5 जण तीन दिवसांपूर्वी माहुलीच्या जंगलात फिरायला गेले होते. मात्र धीरज पाण्यात बुडाला असताना त्याला टाकून मित्रांनी तिथून लगेच पळ काढला.

हे देखील पहा -

त्यानंतर धीरजच्या मित्रांनी त्याच्या घरी सांगितले की, आम्ही भिवंडीला गेलो गेलो होती तिथे त्याला एका मित्राचा फोन आला आणि तो निघून गेला. कोणत्या मित्राचा फोन आला ते आम्हाला माहीत नाही. शोधाशोध केल्यानंतरही धीरजचा थांगपत्ता लागत नसल्याने शेवटी नारपोली पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांनी तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी धीरजसह फिरायला गेलेल्या मित्रांना आपल्या सोबत घेऊन शोधमोहीम सुरु केली. पण मित्रांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. शेवटी अंधार झाल्याने शोध मोहीम बंद करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. त्या वेळी देखील मित्रांनी पोलिसांसमोर बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, तीन दिवसांनी बिंग फुटलं
नाशिकमधील फटाके बंदीवर आज निर्णय होणार; निर्णयावरून गोंधळाची शक्यता...

मात्र, शेवटी पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोन्ही मुलींनी माहुलीच्या घनदाट जंगलात पायवाटेने अतिशय उंच ठिकाणी असलेल्या धबधब्याजवळ नेले. तिथे धीरजचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी दोन मुली आणि एका मित्राला ताब्यात घेतले आहे. सोबत असलेला पाचवा मित्र रिक्षा ड्रायव्हर असून तो फरार झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com