Pune : कर्ज फेडण्यासाठी लोन अ‍ॅपकडून दबाव; पुण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

सोहेल शेख (वय 25, विमाननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Pune crime news
Pune crime news saam tv

Pune Crime News : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोन अ‍ॅपवर होणाऱ्या सततच्या बदनामीमुळे 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या केली आहे. सोहेल शेख (वय 25, विमाननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोहेलचे वडील जावेद शेख यांनी पुणे पोलिसांत तशी तक्रार दाखल केली आहे. (Pune Today News)

Pune crime news
Jalgaon: हा तर बाळासाहेबांचा अवमान! बॅनरमागे सुरु हाेता सट्टा; ठाकरे- शिंदे गटाचा संघर्ष उफाळला

प्राप्त माहितीनुसार, सोहेल याने काही महिन्यांपूर्वी वेग वेगळ्या लोन अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले होते. एक कर्ज फेडण्यासाठी तो दुसरे लोन घ्यायचा. कर्जाची रक्कम वाढतच गेल्याने अखेर सोहेलला कर्ज फेडणे अशक्य झाले. घेतलेल्या कर्जाची तो वेळेवर परतफेड करू शकला नाही. त्यामुळे त्याला धमक्यांचे आणि शिवीगाळ करणारे फोन येत होते.

इतकंच नाही तर तुझी बदनामी केली जाईल, असे देखील संबधित लोन अ‍ॅपद्वारे सांगण्यात येत होते. या त्रासाला कंटाळून सोहेल शेख याने राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, सोहेलचे वडील जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com