Railway Stunt Video : तरुणाची सुस्साट ट्रेनमध्ये जीवघेणी स्टंटबाजी, मुंबई लोकलमधील VIDEO व्हायरल

Viral VIdeo : तरुण धावत्या ट्रेनमधून दरवाजाच्या शिडीवर उभा राहून स्टंट करत असल्याचे दिसून येत आहे.
Train Stunt
Train Stunt Saam TV

संजय गडदे

Vasai Virar News :

मुंबई रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन वारंवार सूचना करत असतं. मात्र काही तरुण या सूचनांकडे कानाडोळा करत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील धावत्या लोकल मधून स्टंट करणाऱ्या एक तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ काल रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनचा असल्याचं समोर आले आहे. या धावत्या ट्रेनमधून स्टंट करताना तो तरुण आपल्या जीवाशी खेळत असल्याचे देखील या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Train Stunt
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर मनसेचा ग्राऊंड रिपोर्ट; मंत्री रविंद्र चव्हाणांच्या दाव्याची पोलखोल, पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये तरुणाने चालत्या ट्रेनच्या दरवाजाच्या तळाला स्पर्श काराताना आणि पायऱ्या चढून तो स्टंट करताना दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये हा तरुण जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करत प्रवास करत आहे. (Mumbai News)

Train Stunt
Mumbai- Ahmedabad National Highway : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात, पती मृत्यूमुखी; पत्नीसह मुले सुखरुप

एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. मात्र हा तरुण कोण आहे, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र रेल्वे पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नागरिकांची आहे.

स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणावर पोलिसांनी कारावाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. इंस्टाग्रामवर रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काही तरुण स्वतःच्याच जीवाशी खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com