Crime: अंबरनाथमध्ये भररस्त्यात तरुणाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसांकडून परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल
Crime News
Crime NewsSaam tv

अंबरनाथ - एका तरुणाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. चिंचपाडा परिसरातील ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली असून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांकडून (Police) देण्यात आली आहे.अंबरनाथच्या (Ambernath) चिंचपाडा परिसरात सलमान शेख हा तरुण १२ ऑगस्ट रोजी रस्त्याने जात होता.

हे देखील पाहा -

यावेळी त्याला निषाद सय्यद आणि सिद्दीक चौधरी या दोघांनी रस्त्यावर पाडून जबर मारहाण केली. हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मारहाण करणारा निषाद सय्यद याची आई झुलेखा सय्यद या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला.

हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. मात्र या प्रकरणात राजकारणाचा काहीही संबंध नसून हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

झुलेखा सय्यद आणि बांधकाम व्यावसायिक नझीर शेख यांचे कौटुंबिक वाद असून सलमान या नझीर शेख यांच्याकडे काम करतो. त्याच वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com