दुर्दैवी : कामावरुन घरी जाताना काळाचा घाला; PMPML च्या धडकेत हमाल व्यावसायिकाचा मृत्यू

मोटारसायकल चालकाच्या मृत्युस कारणीभुत झाल्याचा गुन्हा बस चालकाविरोधात पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
Pune PMPML Accident
Pune PMPML AccidentSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

Pune: पुण्यात (Pune) 'पीएमपीएमएल'च्या धडकेत एका दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शंकर बबन काळे, वय वर्ष 31 असं मयत दुचाकी चालकाचे नाव असून ते हवेली तालुक्यातील जांभळी या गावचे रहिवाशी आहेत. ही बहुली रस्त्यावर काल गुरुवारी श्रीकमळादेवी मंदिर (पिकॉक-बे) येथे संध्याकाळी घडली.

या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात PMPML बस चालक कमलाकर शेवाळे वय 29, रा. वाघोली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली आहे. शंकर काळे हे पुण्याहून दुचाकीवरुन आपल्या गावाला जात असताना श्रीकमळादेवी मंदिर (पिकॉक-बे) येथे आले असता त्याचवेळी विरुद्ध दिशेने आगळंबे गावाकडुन मार्केट यार्डकडे PMPML बस येत होती.

पाहा व्हिडीओ -

यावेळी बहुली रस्त्यावरील श्रीकमळादेवी मंदिराजवळ पुण्याच्या बाजूला ५०० मीटर अंतरावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस (Police) निरीक्षक दादासाहेब पवार पोहचले असता त्यांनी तातडीने काळे यांना रुग्णालयात हलविले दुचाकी बाजूला घेतली.

दरम्यान, बसचालक शेवाळे याने त्याच्या ताब्यातील बस ही निष्काळजीपणे चालवत मोटारसायकल चालकास समोरासमोर जोराने धडक दित त्याला गंभीर जखमी करुन त्याच्या मृत्युस कारणीभुत झाल्याचा गुन्हा बस चालकाविरोधात उत्तमनगर पोलिस ठाण्यात (Uttamnagar Police Station) दाखल झाला आहे.

Pune PMPML Accident
Dombivli: नशेत चालवली कार; सात वाहनांना धडक २ रिक्षांचा चक्काचूर

याबाबत, फौजदार दीपाली लुगडे अधिक तपास करीत आहेत. काळे हे मार्केटयार्ड परिसरात हमालीचा व्यवसाय करीत होते. काल ते आपलं काम आटपून घरी जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या मागे पत्नी, २ मुली आईव २ भाऊ असा परिवार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com