रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळणार हे नक्की!

विशाल सवणे
शुक्रवार, 20 मार्च 2020

. मध्य आणि हार्बर लाईनवर दिवसा ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम मार्गावर रात्रकालील ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉकचा प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

मुंबई - रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युचं आवाहन लोकांना केलं आहे. या कर्फ्युला मेगाब्लॉकमुळे मुंबईत चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावरही रविवारी (22 मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर लाईनवर दिवसा ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम मार्गावर रात्रकालील ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉकचा प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

पश्चिम मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान, रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवार आणि रविवार या दोन्ही तारखांना घेण्यात येणार आहेत. रात्रकालीन ब्लॉक रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुरु होईल. हा ब्लॉक 3 वाजूनन 40 मिनिटांपर्यंत चालेल. अप मार्गावर घेण्यात येणा-या या ब्लॉकदरम्यान, रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरचं काम करण्यात येणार आहे.  ब्लॉक काळात जलद लोकल धीम्या मार्गावरुन धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर दिवसा कोणाताही ब्लॉक नसेल. 

 

TWEET- 

 

 

मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे डाऊन मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे लोकलसेवा 20 मिनिटं उशिराने असेल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. जलद गतीच्या लोकल मुंब्राच्या पुढे डोंबिवलीहून फास्ट मार्गावर डायवर्ट करण्यात येणार आहेत. तर सीएसएमटीहून सुटणा-या जलद लोकल माटुंगा आणि सायन या स्थानकांवरही थांबणार आहेत. 

त्याचप्रमाणे अप मार्गावरुन सुटणा-या गाड्या मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानका थांबणार आहेत. या गाड्याही 15 मिनिटं उशिराने धावतील, असंदेखील रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.  सकाळी 11 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान ब्लॉकवेळेत सर् लोकल 15 मिनिट उशिरानं धावतील.

 

हार्बर मार्गावरही ब्लॉक

पनवेल, वाशी, बेलापूर आणि सीएसएमटी दरम्यान तसंच मुंबई, वडाळा ते वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या लोकलसेवा ब्लॉककाळात बंद राहणार आहेत. दरम्यान, पनवेल ते कुर्ला दरम्यान, विशेष लोकलसेवा प्रवाशांसाठी चालवण्यात येणार आहे.

 

 

पाहा व्हिडीओ - 

 

mumbai-suburban-train-services-to-be-hit-due-to-mega-block


संबंधित बातम्या

Saam TV Live