मुंबई विद्यापीठ लवकरच जाहीर करणार टाइमटेबल 

मुंबई विद्यापीठ लवकरच जाहीर करणार टाइमटेबल 

मुंबई: कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्यांच्या शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठामध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष आणि हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून परीक्षांसाठी तसेच शैक्षणिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य मिळणेसाठी जिल्हानिहाय समुपदेशनाची सोय लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार झाल्यावर महाविद्यालयांसाठी परीपत्रक, परीक्षांचे वेळापत्रक, आसनव्यवस्था, आणि विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे जाहिर केली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. 

 विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्यान्वये पदविका, पदवीपूर्व आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा घेताना सामाजिक अंतर, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यांसह अनुषंगिक बाबींचा सखोल अभ्यास करुन परीक्षांचे नियोजन करण्यात येत असून त्याअनुषंगाने या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठामार्फत जाहीर केले जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. 
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रासाठी व वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार १५८ परीक्षांसाठी सुमारे २ लाख २२ हजार ५८१ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. या कृती आराखड्यान्वये ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी, दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन यासह अनुषंगिक बाबींचा सखोल अभ्यास करून सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रकान्वये लवकरच निर्गमित केल्या जाणार आहेत.विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीवरून मुंबई विद्यापीठातर्फे पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील १५८ परीक्षांच्या नियोजनासह शैक्षणिक वेळापत्रकासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. 

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व तद्अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्याकरीता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत केली होती. या समितीने ०६ मे, २०२० रोजी आपला अहवाल शासनास सादर केला. त्या अनुषंगाने ०८ मे, २०२० रोजी सामंत यांनी परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाबद्दल विद्यार्थी आणि भागधारकांशी संवाद साधून याचे स्वरुप विशद केले होते.

WebTittle :: Mumbai University to announce timetable soon


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com