धक्कादायक : चक्क युद्धनौकेत बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप

सूरज सावंत
सोमवार, 7 जून 2021

आपल्यावर डिकमिशन्ड झालेल्या एका भारतीय  युद्ध नौकेत बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. पोलिसांनी या तक्रारीवरुन एका ३२ वर्षीय नौदल कर्मचाऱ्याच्या विरोधात व्हीपीरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेतली आहे.

मुंबई : आपल्यावर डिकमिशन्ड झालेल्या एका भारतीय  युद्ध नौकेत Indian War Ship बलात्कार Rape झाल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. पोलिसांनी Police या तक्रारीवरुन एका ३२ वर्षीय नौदल कर्मचाऱ्याच्या विरोधात व्हीपीरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेतली आहे. Mumbai Women Complaints about Rape in Decommissioned War Ship

इम्रान खान लतीफ खान असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या तक्रारीनुसार आरोपीनं महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून दोन लाख २१ हजार रुपये घेतले. तसेच या महिलेवर लैंगिक अत्याचार केला, असा या कर्मचाऱ्यावर आरोप आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे देखिल पहा

यातली गंभीर बाब म्हणजे ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्यात आले त्यापैकी एक डिकमिशंड केलेली युद्धनौका आहे, असे महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. २०१७ मध्ये ही युद्धनौका डिकमिशंड झाली आहे. Mumbai Women Complaints about Rape in Decommissioned War Ship

कोर्लईचा लाॅकडाऊन कुणाला रोखण्यासाठी - सोमय्या

त्याशिवाय दिल्ली येथील गणेश भवन, जयपूर येथील हॉटेल व दिल्ली येथील भरत हाऊस येथेही आरोपीनं आपल्यावर अत्याचार केल्याचा या महिलेचा आरोप आहे. याप्रकरणी व्हीपी रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live