काय सांगताय काय? मुंबईच्या बाजारातून मासेच झालेत गायब!

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

मुंबईच्या मासळी बाजारातून मासेच गायब झालेत. जे काही थोडेफार मासे बाजारात विक्रीसाठी येतायत, त्यांच्या किमती ऐकून मासे खावे की न खावे असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडलाय .

मुंबई: थंडीच्या दिवसात माशांचे (Fish) वाढलेले दर उन्हाळ्यापर्यंत उतरणीला लागत असतात. पण यंदा एप्रिल (April) उजाडला तरी माशांचे दर वाढतच चाहते आहेत. त्यामुळे मासे खरेदीसाठी अधिकची पदरमोड करताना चोखंदळ मत्स्यप्रेमींना हात आखडता घ्यावा लागतोय. Mumbais fish market has become expensive

समुद्रकिनाऱ्यालगत (Sea Shore) मासे निरनिराळ्या अनेक कारणांमुळे मिळेनासे झाले असून खोल समुद्राऐवजी किनाऱ्यालगत मासेमारी करणारे मच्छीमार (Fishermen) संकटात सापडले आहेत, तर माशांची आवक कमी झाल्यामुळे मासेविक्री करणाऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. मासे विक्रेते कमी आवक मुळे मत्स्यव्यवसाय (Fisheries) बंद होण्याच्या मार्गावर आहे. मासे कमी मिळत असल्यामुळे  त्याच्या किमती वाढत आहे. परिणामी ताटात येणारी मासळी महाग झाली म्हणून ग्राहक मासे खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. 

कसे आहेत सध्या माशांचे दर-  

कोळंबी ६०० रु किलो झाले, आधी ३०० होते

पापलेट १२०० रु किलो झाले, आधी ७०० होते

सुरमई ६०० रु किलो झाले, आधी ३०० होते

हलवा ६०० किलो झाले, आधी ३०० होते

बोंबील २५० किलो झाले, आधी १०० होते

कोरोनामुळे मासळी बाजारापासून दुरावलेला ग्राहकवर्ग अद्याप बाजाराकडे फिरकलेला नाही. शिथिलीकरणानंतर व्यवसाय सुरू झाला, पण तोही जेमतेम आहे.  त्यात माशांची कमतरता, भाववाढ यामुळे ग्राहक मासे विकत घेत नाहीत. ऑनलाइन मस्त्यखरेदीला नव्या पिढीची पसंती आहे. त्यामुळे शिथिलीकरणानंतरही मासळी बाजार ओसच पडले आहेत .Mumbais fish market has become expensive

Edited by- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live