खासगी लॅबवर महापालिकेची तोंडदेखली कारवाई

साम टीव्ही
बुधवार, 10 मार्च 2021

पुण्यात कोरोना रुग्णांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ठप्प

खासगी लॅबवर महापालिकेची तोंडदेखली कारवाई

मनपाच्या बोगस कारवाईचा 'साम टीव्ही'कडून पंचनामा

पुणेकरांच्या बेफिकीरीमुळं कोरोना वाढतोच आहे. त्यात पुणे महापालिकाही कारवाईचं सोंग करतेय. पुणे महापालिकेनं सील केलेल्या लॅब खुल्या होत्या. साम टीव्हीनं महापालिकेच्या बोगस कारवाईचा पर्दाफाश केलाय.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत. कोरोना रुग्ण कोणाच्या संपर्कात आला याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच होत नसल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. खासगी लॅब कोरोना रुग्णांची माहितीच देत नसल्याचा दावा महापालिकेनं केला.  महापालिकेनं कुणावर तरी कारवाई करायची म्हणून तीन लॅब सील केल्या.

साम टीव्हीनं जेव्हा सील केलेल्या लॅबची पडताळणी केली तेव्हा तिथं तर सगळं काम सुरळीत सुरु होतं. महापालिकेनं फक्त सरकारला दाखवण्यासाठी कारवाईचं नाटक केलं होतं का असा प्रश्न निर्माण झालाय.

 महापालिका प्रशासन जर कारवाईचं ढोंग करत असेल तर पुणेकरांचं काही खरं नाही. येत्या काळात कोरोना रुग्ण वाढल्यास त्याला बेफिकीर पुणेकर आणि महापालिका प्रशासनही तेवढंच जबाबदार असेल.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live