पाण्यासाठी पालिकेला मोजावे लागणार कोटी रु

पाण्यासाठी पालिकेला मोजावे लागणार कोटी रु

पुणे : जलसंपदा विभागाच्या नव्या दरानुसार वर्षभराच्या पाण्यासाठी पालिकेला जवळपास ६० कोटी रुपयेही मोजावे लागणार आहेत. महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाणी वाटपासाठी झालेला करार संपुष्टात आल्यानंतर देण्यात आलेली सहा महिन्यांची वाढिव मुदतही ३१ ऑगस्टला संपणार आहे. त्यापुर्वी नवीन कराराचा मसुदा आणि तसेच भराव्या लागणाऱ्या अनामत रकमेविषयी कळविण्यासंदर्भात पालिकेने जलसंपदा विभागाला सोमवारी पत्र दिले आहे. करारामध्ये उल्लेख केलेल्या मसुद्याविषयी व पाटबंधारे विभागाला द्यावयाच्या अनामत रकमेविषयी पाटबंधारेकडून लेखी अभिप्राय मागविण्यात आले होते. परंतू, अद्याप पालिकेला याबाबतची माहिती मिळालेली नसल्याचे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.   शहराच्या पाणी वापरासाठी जलसंपदा आणि महापालिकेमध्ये झालेला करारनामा २८ फेब्रुवारी २०१९ रोजी संपुष्टात आला. या कराराची मुदत सहा वर्षांची होती. मुदत संपल्यानंतरही पाणी वापर सुरु ठेवल्यास त्याला सव्वापट दर आकारला जातो. त्यामुळे पाणी वापराची मान्यता कार्यान्वित ठेवण्यासाठी जुना करारनामा संपण्यापुर्वी नवीन करारनामा करणे आवश्यक आहे.  महापालिकेचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार करुन सादर करण्याबाबत तसेच थकबाकी भरण्याबाबत कळविण्यात आलेले होते. त्यानुसार पालिकेकडून १२ एप्रिल रोजी पाण्याचे अंदाजपत्रक तयार करुन जलसंपदाच्या अधीक्षक अभियंत्यांना सादर करण्यात आले होते
पुणे पाटबंधारे मंडळाने करारनामा नुतनीकरण करण्याची मुदत पुढील सहा महिन्यांसाठी वाढवून मिळण्याबाबत जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे शिफारस केलेली होती. त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत नुतनीकरण करण्याची मुदत वाढवून देण्याकरिता मान्यता दिली होती. 

तसेच कालवा समिओतीच्या २३ नोव्हेंबर २०१८ च्या बैठकीमध्ये ही थकबाकी भरण्याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी महापालिकेकडील थकबाकी निश्चित करुन चालू आर्थिक वर्षात चार हप्त्यात भरण्याविषयी सुचना दिल्या होत्या. पालिका आणि जलसंपदा विभागात झालेल्या करारनाम्याची वाढीव मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात येत असल्याने करारात उल्लेख केल्याप्रमाणे मसुद्याविषयी व अनामत रकमेविषयी लेखी अभिप्राय कळविण्यात यावा असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. अन्यथा मागील कालावधीच्या करारनाम्याचा मसुदा पुढील कालावधीसाठी ग्राह्य धरण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे. 
=====
पाटबंधारे विभागाच्या जुन्या दराप्रमाणे पालिकेला दर वर्षी २८ ते ३० कोटी रुपये मोजावे लागत होते. परंतू, गेल्या वर्षी नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा नवीन दरानुसार पालिकेला जवळपास दुप्पट म्हणजेच अंदाजे ६० कोटी रुपये पाण्यासाठी मोजावे लागणार आहेत. शहराला महिन्याकाठी साधारणपणे १.४० टीएमसी पाणी लागते, त्यासाठी पाच कोटी रुपये दरमहा द्यावे लागणार आहेत. 
===
महापालिकेला प्रतिदिन १३५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये दरवर्षी साधारणपणे पाच टक्क्यांनी वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. जलसंपत्ती नियामक मंडळाने पाटबंधारे विभागाला जुन्या अटी व शर्ती बदलून नव्याने तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाटबंधारे विभागाकडून करारनाम्यासाठीचा मसुदा पालिकेला प्राप्त झाल्यावर त्याची विधी विभागाकडून तपासणी करुन त्यामध्ये आवश्यक दुरुस्त्या सुचवून पुन्हा पाटबंधारे विभागाला पाठविल जाईल. परंतू, करारनाम्याचा हा सर्व प्रवास ३१ ऑगस्टच्या आत होईल याची खात्री नाही. त्यामुळे पुन्हा काही महिन्यांची वाढीव मुदत घ्यावी लागणार आहे


Web Title: The municipality will have to calculate crores for water
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com