घराच्या वाटणीवरून भावानेच केली भावाची हत्या 

अजय दुधाणे
गुरुवार, 27 मे 2021

सख्या भावाने आपल्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर Ulhasnagar  मध्ये समोर आलाय.

उल्हासनगर :  सख्या भावाने आपल्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर Ulhasnagar  मध्ये समोर आलाय. घराच्या वाटणीवरून ही हत्या झाल्याचं समोर आलाय. विठ्ठल कदम आणि संतोष कदम हे दोघे सख्खे भाऊ. जुन्या भांडणाचा राग धरत संतोषने विठ्ठलच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली आहे. (The murder of the brother by the brother himself from the division of the house) 

पुलवामा हल्ल्यातील शहिदाची पत्नी होणार सैन्यात दाखल

या दोघा भावांची आई जनाबाई  ज्या घरात राहत होत्या  त्या घराच्या वाटणी आणि हक्कावरून दोघा भावांमध्ये वाद होते. संतोष कदम हा वारंवार आपल्या आईच्या घरी जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालायचा. १९ मे रोजी त्याने आपल्या आईला यावरूनच शिवीगाळ करीत धिंगाणा घातला. त्यावेळी आई जनाबाई यांनी विठ्ठल कदमला फोन करून घरी बोलावून घेतले. यावेळी दोघा भावांमध्ये वाद झाले. संतोष आपल्या आईच्या घरावर हक्क सांगत असताना हे माझ्या देखील आईचं घर आहे असे विठ्ठल ने त्याला सांगितले. मात्र थोड्या वेळाने विठ्ठल तुला बघून घेईन असं म्हणत आरोपी संतोष तेथून निघून गेला. याच दरम्यान बुधवारी रात्रीच्या सुमारास कॅम्प नंबर १ च्या भिम नगर परिसरात विठ्ठल हा कामानिमित्त आला होता. याच वेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून संतोषने विठ्ठल च्या डोक्यात लोखंडी रॉड ने जोरदार प्रहार करीत हल्ला केला. यात विठ्ठलाचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात संतोष कदम याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मात्र केवळ घराच्या वाटणीवरून आपल्या सख्या भावाची भावनेच्या हत्या केल्याने उल्हासनगर शहरात खळबळ उडाली आहे. 

Edited By - Anuradha Dhawade 


संबंधित बातम्या

Saam TV Live