तरुणाईला झालंय काय? पुण्यात खेळातल्या भांडणातून मित्राने केला खून, क्राईम पेट्रोल पाहून मित्राचा काढला काटा

साम टीव्ही
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021
  • पुण्यात खेळातल्या भांडणातून मित्राने केला खून 
  • क्राईम पेट्रोल पाहून मित्राचा काढला काटा
  • नाशकात जुगारात हरल्याने तरुणाची आत्महत्या

पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. मुलं काय करतायत ते पाहा. कारण, क्राईम मालिका पाहून मुलंही तशी वागू लागलीयत. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. नक्की काय घडलं पुण्यात वाचा संपूर्ण बातमी.

पुण्यात आणि नाशिकमध्ये दोन धक्कादायक घटना समोर आल्यायत. कोथरूडमधील अल्पवयीन मुलाच्या खूनाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. क्राईम पेट्रोल मालिका पाहत असल्यानं खुनाची कल्पना सुचल्याची कबुली अल्पवयीन आरोपीनं दिलीय. पकडा-पकडी खेळत असताना दोन वेळा राज्य आल्याच्या रागातून आरोपीनं मित्राच्या डोक्यात सिमेंटचा दगड मारला. यात मित्र गंभीर जखमी झाला. घरातील लोक रागवतील म्हणून त्याने पुन्हा मित्राच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी करून मातीच्या ढिगाऱ्यात पुरलं. ही धक्कादायक घटना कोथरूडमधील केळेवाडीत घडली. पोलिस तपास करत असताना मुलाच्या खूनाची उकल झाली. त्यावेळी क्राईम पेट्रोल मालिका पाहून मित्राचा खून केल्याची माहिती समोर आलीय. 

लहान मुलंही क्राईम मालिका पाहून सर्रास गुन्हे करतायत. मुलांमध्ये आदरयुक्त भीती राहिली नाहीये. मुलं घरात काय पाहतात याकडे पालकांचा लक्ष नाहीये. मुलं टीव्ही पाहत असतील तर ते काय पाहतात? काय अनुकरण करतात? याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

तर नाशिकमध्ये बिंगो रोलेट या ऑनलाईन जुगारात हारल्यामुळे तरुणानं आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. नामदेव चव्हाण असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून, नशीब आजमावण्यासाठी बिंगो रोलेटमध्ये पैसा लावला. एक रुपयाला चार रुपये असा चांगला आकर्षक परतावा मिळाला. मात्र, नंतर अधिक जिंकण्याच्या आमिषाने याने घरात होता तो पैसा अडका लावला. अखेर उधारी करत करत 25 लाखांवर खेळ गेला. अखेर बिंगो रोलेट चालकांच्या वसुलीच्या दहशतीमुळे नामदेवनं आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारानं हळहळ व्यक्त केली जातेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live