कोरोना काळात मुस्लिम युवकांनी केले ९२३ मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

mulsim youth
mulsim youth

यवतमाळ - आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांचा सहभाग असलेल्या अंत्ययात्रा यवतमाळच्या स्मशानभूमीने पाहिल्या आहेत. आज मात्र कोरोनामुळे Corona परिस्थिती बदलली आहे . रक्ताचे आणि अगदी जवळचेही नातेवाईक मृतदेहाला स्पर्श करायला आता घाबरत आहे .अशा परिस्थितीत नगर पालिका Nagar palika नियुक्त ४  कर्मचारी ऍम्ब्युलन्स मधून मृतदेह उतरवितात . तर धर्माने मुस्लिम असलेले अब्दुल जब्बार आणि शेख अहमद हे दोघे हिंदू विधीनुसार Hindu manner कोणतीही भीती न बाळगता मृतदेहावर dead body हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करतात. Muslim youth cremated 923 bodies in Hindu manner

अब्दुल आणि शेख अहमद हे कोरोना योद्धा आहेत त्यांनी  मागच्या वर्षांपासून कोरोना काळात झालेल्या ९२३ मृतदेहांवर हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार केले आहे . आयुष्यभर जात ,धर्म करणारा माणूस  जेव्हा  चार खांद्यावर चढतो त्याच्या अंतिम प्रवासाला सहाय्य करणारे हात केवळ माणसांचे असतात आणि जेव्हा  मृत्यू हा कोरोना सारख्या आजाराने झाला असेल तर मृत्यूचे ते क्षण आणि त्याचे अंत्यसंस्कार हे संवेदना गोठवून टाकणारे क्षण असतात अशा परिस्तितीत आपले ही परके होऊन जातात . अश्या बिकटच्या परिस्थितीत परिवार ,कुटुंब ,धर्म आणि समाज बाजूला ठेवून अंत्यसंस्कार  करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे हे कोरोना योद्धा मात्र कायमच दुर्लक्षित असतात. म्हणूनच या कोरोना योध्यांना सलाम.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com