N Chandrababu Naidu यांचे दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबू नायडू करत आहेत.

जर, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलंच माहित आहे. असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही चंद्राबाबूंच्या उपोषणाला भेट दिली. 

स्टेजवरुन राहुल गांधी यांनी विशेष राज्याच्या मागणीचा पुनरुरच्चार केला. तसंच मोदी हटावतीही घोषणा करत, पुन्हा एकदा ऱाफेलवरून मोदींना टार्गेट केलं.

WebTitle : N Chandrababu Naidu starts one day hunger strike against central government at delhi 

संबंधित बातम्या

Saam TV Live