''नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्या''

विकास काटे
बुधवार, 9 जून 2021

ठाणे शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जेल, पोलिस लाइन, कळवा पूल, शिवाजी चौक, विटावा अशी मानवी साखळी आंदोलन करणार आहेत.  आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई राष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. (Name the International Airport in Navi Mumbai Dinkar Balu Patil)

यासंबंधी माहिती देताना दशरयदादा यांनी सांगितले की, लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटना मानवी साखळी आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

हे देखील पाहा

ठाणे शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जेल, पोलिस लाइन, कळवा पूल, शिवाजी चौक, विटावा अशी मानवी साखळी आंदोलन करणार आहेत.  आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live