महाराष्ट्र काँग्रेसचे नाना पटोले कॅप्टन, नवा कॅप्टन देणार काँग्रेसला उभारी?

साम टीव्ही
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021
  • महाराष्ट्र काँग्रेसचे नाना पटोले कॅप्टन
  • 6 कार्याध्यक्ष, 10 उपाध्यक्षांची टीम
  • नवा कॅप्टन देणार काँग्रेसला उभारी?

काँग्रेसनं राज्यात संघटनात्मक बदल केलेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आलीय. नव्या प्रदेशाध्यक्षांसोबत ६ कार्याध्यक्ष आणि १० उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलीय. राज्यात काँग्रेस पक्षसंघटना वाढवण्याचं आव्हान टीम पटोलेंसमोर असणार आहे.

देशभरात काँग्रेसची पिछेहाट सुरु असताना राज्यात काँग्रेसला अनपेक्षितरित्या सत्तेत सहभागी होता आलं. काँग्रेस सत्तेत असली तरी काँग्रेसचं सरकार अशी छाप काँग्रेसच्या मंत्र्यांना पाडता आलेली नाही. सत्ताधारी असले तरी काँग्रेसला राज्यात पक्ष वाढवण्यात तेवढंसं यश आलं नाही. त्यामुळंच आक्रमक अशा नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलंय.

नाना पटोले यांच्यासोबत ६ कार्याध्यक्ष आणि १० उपाध्यक्षांची टीमही देण्यात आलीय. यामध्ये शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, आणि प्रणिती शिंदे हे कार्याध्यक्ष असतील. कार्याध्यक्ष नेमताना अनुभवी नेते, तरुण नेतृत्वाला स्थान देतानाच प्रादेशिक समतोल साधण्यात आलाय.

आक्रमक नेते अशी नाना पटोलेंची ओळख आहे. नाना पटोलेंच्या नेतृत्वात गटातटांच्या काँग्रेसला उभारी मिळेल का हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live