फलटण मध्ये नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने उभारले तब्बल 100 बेडचे कोविड सेंटर

ओंकार कदम
बुधवार, 21 एप्रिल 2021

सातारा जिल्ह्यातील फलटण मध्ये 100 बेडचे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्यामुळे फलटण मधील वाढत्या कोरोना रुग्णांना एक दिलासा मिळाला आहे. फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी हे 100 बेडचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. 

सातारा: सातारा Satara जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या Corona रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. जिल्ह्यात रोज 1500 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहेत. जिल्हा प्रशासनाची Administration सुद्धा रुग्णांना बेड मिळवून देताना दमछाक होताना दिसत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी  सातारा जिल्ह्यातील फलटण Falton मध्ये कोव्हिड केअर सेंटर Covid Care Center उभारण्यात आले आहे. फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे Nandkumar Bhoite यांनी हे 100 बेडचे कोव्हिड सेंटर उभारले आहे.  Nandkumar Bhoite set up a Covid Center of 100 beds at his own cost

विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले. विशेष म्हणजे फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे Nandkumar Bhoite यांनी स्वखर्चातुन हे 100 बेडचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. या सेंटर मध्ये 28 ऑक्सिजन बेड 72 सर्वसाधारण बेड असणार आहेत.

या सेंटर साठी आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी आणि मेडिकल स्टाफ, औषध, रुग्णांसाठी दोन वेळचे जेवण आणि नाश्ता अशी सगळी सोय मोफत करण्यात आली आहे. या कोविड सेंटर मुळे फलटण मधील रुग्णांना तर दिलासा मिळणारच आहे. तसेच जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण सुद्धा कमी होणार आहे. 

Edited By- Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live