येत्या आठ दिवसांत भाजपप्रवेश  - राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

सावंतवाडी - युती होवो किंवा न होवो, त्याचा माझ्या भाजपप्रवेशाशी काही संबंध नाही. येत्या आठ दिवसांत माझा प्रवेश निश्‍चित आहे. तसा शब्द मला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दिला असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ‘नाणार’बाबत माझी भूमिका भाजपमध्ये गेल्यावर स्पष्ट करेन. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या भाषेला उत्तर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राणे यांनी येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी आपल्या भाजपप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राणे म्हणाले, ‘गेले तीन दिवस मी जिल्ह्याचा दौरा करीत आहे. आगामी भाजपप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांना अज्ञानात ठेवून निर्णय घेणे मला उचित वाटले नाही. यासाठी त्यांच्याशी संवाद साधत आहे. ज्याप्रमाणे आपण मला आतापर्यंत साथ दिली, तशीच साथ भविष्यातही मिळावी, असे कार्यकर्त्यांना सांगितल्यावर ‘जेथे तुम्ही तेथे आम्ही’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शेवटपर्यंत ते माझ्यासोबत असतील.’

Web Title: Narayan Rane BJP Entry Politics
 
संबंधित बातम्या

Saam TV Live