'प्रगत महाराष्ट्रात बुद्धू मुख्यमंत्री' म्हणत नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

साम टीव्ही
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

द्धव ठाकरेंनी बेईमानी करून हिंदुत्वाला मुठमाती देत मुख्यंमत्रीपद मिळवलं. मुख्यमंत्रिपदासाठी ते लायक नाही अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणें यांनी अत्यंत शेलक्या शब्दात टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून हिंदुत्वाला मुठमाती देत मुख्यंमत्रीपद मिळवलं. मुख्यमंत्रिपदासाठी ते लायक नाही अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला.

उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण म्हणजे निव्वळ अपयश झाकण्याचा प्रयत्न होता असंही राणेंनी म्हंटलंय. राणेंनी आपल्या भाषणात अनेक मुद्यांना हात घातला. सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्याच आहे. आदित्य ठाकरेना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असे आरोपही नारायण राणेंनी केले आहेत.

संजय राऊत विदूषक आहे अशी टीकाही नारायण राणेंनी केलीय. तर उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे असून मराठ्यांना आणि धनगर समाजाला ते आरक्षण का देऊ शकते नाहीत असा सवालही राणेंनी उपस्थित केलाय. 

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे चांगलेच ताशेरे ओढलेत. कालच्या भषणात ठाकरेंनी कुठेही महाराष्ट्रातील विकासाचा मुद्दा किंवा कोरोनासंदर्भातील मुद्दा घेतला नाही तर भलतंच काही तरी ते बोलले असंही राणे म्हणालेत. यासह मोदींच्या जीवावर शिवसेनेनं 56 आमदार निवडून आणलेत. पुढील काळात 15 आमदार पण निवडून येणार नाहीत असं राणे म्हणालेत.

पाहा नारायण राणेंची संपूर्ण पत्रकार परिषद  -


संबंधित बातम्या

Saam TV Live