Loksabha 2019 : शरद पवार मैदान सोडून पळाले - नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 एप्रिल 2019

अकलूज : शरद पवार हे स्वतःचे नुकसान कधीच करत नाहीत. इतरांचा बळी गेला तरी चालेल. भगवे मैदान पाहून शरद पवारांनी मैदान का सोडले हे आता कळत आहे. ते खूप अनुभवी आहेत, हवेची दिशा पाहून ते निर्णय घेतात. शरद पवार निवडणुकीचे मैदान सोडून पळाले, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

 

 

 

 

अकलूज : शरद पवार हे स्वतःचे नुकसान कधीच करत नाहीत. इतरांचा बळी गेला तरी चालेल. भगवे मैदान पाहून शरद पवारांनी मैदान का सोडले हे आता कळत आहे. ते खूप अनुभवी आहेत, हवेची दिशा पाहून ते निर्णय घेतात. शरद पवार निवडणुकीचे मैदान सोडून पळाले, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

 

 

 

 

 

 

माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (बुधवार) अकलूज येथे सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, महादेव जानकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. माढ्यात युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यात लढत होत आहे. राम राम मंडळी असे म्हणत मोदींनी सभेला सुरवात केली. देशभरात अवकाळी पावसामुळे मृत्यू झालेल्या आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल, असेही सांगितले. विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. तुम्ही अशीच महाराष्ट्राची सेवा करत रहा, असे उद्गार मोदींनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल केले.  

मोदी म्हणाले, ''देशात मजबूत सरकार पाहिजे. 2014 मध्ये तुम्ही पूर्ण बहुमत दिल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलो. गरिबांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. देशाला मजबूत सरकार देणार की कमजोर सरकार देणार हे आता तुम्ही ठरवायचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची मिलावट भारताला कधीच मजबूत बनवू शकत नाही. माढावाल्यांना मजबूत सरकार हवे आहे. देशाचा चौकीदार सतर्क आहे. आधीच्या सरकारने केवळ बघ्याची भूमिका केली. पण, आम्ही थेट घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. देशात मोदींना निवडून आणण्यासाठी जनता स्वतः प्रचार करत आहे. पण, हा नवा भारत विरोधकांना खुपतो. गेल्या पाच वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा डाग आमच्यावर लागलेला नाही. काळापैसा आणि भ्रष्टाचारावर आम्ही थेट वार केला आहे. देशाचे नामदार प्रत्येकाला शिव्या देत आहेत. आगोदर चौकीदाराला शिव्या दिल्या. आता सगळे मोदी चोर आहेत, असे म्हणत आहेत. मागासवर्गीय असल्याने मला सतत शिव्या दिल्या जातात. सगळ्याच मागासवर्गीयांना हे आता शिव्या देत आहेत. देशभरात आता सध्या मोदी हटाव शिवाय काहीच बोलत नाहीत.''

परिवाराविषयी शरद पवारांना मोदींविषयी बोलण्याचा हक्क आहे. परिवार हिच माझी प्रेरणा आहे. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांचा विशाल परिवार होता, तेच माझी प्रेरणा आहे. शरद पवार तुम्ही मोदींच्या मार्गावर चालू शकत नाही. तुमचे मॉडेल दिल्लीतील एकच परिवार आहे, असा टोलाही मोदींनी लगाविला.

Web Title: Narendra Modi Slams Sharad Pawar for Running away from election battle in Loksabha 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live