‘ब्रँड मोदी’साठी मंत्र्यांना डच्चू? दुसऱ्या लाटेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल शक्य

मंगेश वैशंपायन
बुधवार, 19 मे 2021

केंद्र सरकारला कोरोना संसर्गाच्या नियोजनात आलेल्या अपयशाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले असून यामुळे ब्रँड मोदीलाही तडा गेल्याने केंद्रीय पातळीवर डॅमेज कंट्रोलला वेग आला आहे.

नवी दिल्ली  : केंद्र सरकारला कोरोना Corona संसर्गाच्या नियोजनात आलेल्या अपयशाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले असून यामुळे ब्रँड मोदीलाही Brand Modi तडा गेल्याने केंद्रीय पातळीवर डॅमेज कंट्रोलला वेग आला आहे.Narendra Modi May Sack Some Ministers from Cabinet

या अपयशातून सावरण्यासाठी नजीकच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात किंवा त्याचा विस्तार देखील होऊ शकतो. यामुळे अनेक मंत्र्यांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असेल पण तो नेहमीसारखा नसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा Croan Second Wave सामना करताना केंद्राची जी नियोजनशून्यता समोर येत आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे देखिल पहा

स्वतःला प्रमाणपत्र देणे थांबवावे
पंतप्रधान मोदींच्या Narendra Modi नेतृत्वाबद्दल सामान्य लोकांमध्ये नाराजी आणि चीड असल्याचेही फीडबॅक भाजपकडे आले आहेत. त्यामुळेच डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी सरकारमध्ये आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकताही मांडली जाते. स्वतःच स्वतःला प्रमाणपत्र देण्याचा प्रयोग यापुढे यशस्वी होईल का? याबद्दल शंका व्यक्त होते आहे. या संकटाच्या काळात देखील केंद्र सरकारची कमकुवत बाजू समोर आणणे म्हणजे थेट मोदींवर टीका, ही भाजपची भूमिका आहे. याबाबत आता लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.Narendra Modi May Sack Some Ministers from Cabinet

दिव्यांग रफीक खानचं पुनावालांना साकडं

याचा परिणाम
‘आयुष्मान भारत’ योजना कुचकामी ठरली
ऑक्सिजन, जीवनावश्‍यक औषधांची टंचाई
देशात टंचाई असताना परदेशात लशींची निर्यात
टीकाकारांवरील कारवाईमुळे सरकार गोत्यात
भाजप नेत्यांच्या आततायीपणामुळे जनता नाराज
बंगालमधील प्रचार, कुंभमेळ्यामुळे वाढलेला संसर्ग
मृतांचे दडविले जाणारे आकडे, गंगेतील प्रेतांचा खच

म्हणून फटका
या सर्वांचा फटका निवडणुकीच्या रिंगणातही बसणार याबद्दल भाजप नेत्यांमध्ये दुमत नाही. कोणी उघडपणे बोलत नसले तरी पश्चिम बंगालसह इतर राज्यांच्या निवडणुका आणि उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांचे निकाल हा त्याचा एक संकेत आहे. कोरोनानंतर मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये सार्वत्रिक नाराजी आहे हे उघड दिसून येत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष आहेत याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले आहे. Narendra Modi May Sack Some Ministers from Cabinet

त्यांना घरी बसवा
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपची परिस्थिती फारशी चांगली नसेल, असा फीडबॅक केंद्रीय नेतृत्वाला गेला आहे. सरकारमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे आणि त्यामुळेच काही मंत्र्यांना घरी बसवावे, असा मतप्रवाह वरिष्ठ पातळीवर आहे. नवीन चेहरे मंत्रिमंडळात यायला हवेत आणि मोदी यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यात कमी पडलेल्यांना घरी पाठवले पाहिजे, हे मत काही भाजप नेत्यांनी सर्वेसर्वा नेतृत्त्वापर्यंतही पोचविल्याची माहिती आहे.

मोदींच्या बाजूने युक्तिवाद नाही
सोशल मीडिया हे मोदी युगातील भाजपचे बलस्थान मानले जाते. एका अभ्यास पाहणीनुसार कोरोना महामारीच्या काळात केंद्रातील महत्त्वाच्या दहा मंत्र्यांनी केवळ मे महिन्यात १ हजार ११० ट्विट्स केली. गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांनी या संपूर्ण काळात फक्त एक ट्विट कोरोना संदर्भात केले आहे. यात पीयूष गोयल Piyush Goyal , रमेश पोखरियाल निशंक आणि एस. जयशंकर यांच्यासारखे मंत्री वगळता एकाही मंत्र्याने पंतप्रधानांच्या बाजूने युक्तिवाद करणारी ट्विट केलेली दिसत नाहीत. Narendra Modi May Sack Some Ministers from Cabinet

ट्विटचा लेखाजोखा
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर कोरोना काळात चौफेर टीका होत असताना ते आणि नितीन गडकरी Nitin Gadkary यांनी मात्र अनुक्रमे २८७ आणि ११० ट्विट केली आणि त्यातील बहुतांशी ट्विटमध्ये कोरोना निर्मूलन उपाययोजनांचा उल्लेख आहे. गडकरी यांच्या बहुतेक सर्व ट्विटमध्ये सर्वसामान्यांचे दुःख दूर करण्याची कळकळ असली तरी पंतप्रधानांचा गुणगौरव नाही. यासारख्या बाबी दिल्लीपर्यंत पोचल्या आहेत.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live