मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईल. या दुर्घटनेस जो जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

मुंबई - कोरोनाच्या Corona संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील hospital ऑक्सिजन oxygen गळतीच्या दुर्घटनेची बातमी मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. Nashik oxygen cylinder leak cm announced 5 lakh rupees help

मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईल. या दुर्घटनेस जो जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे cm udhav thackeray यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती, तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय.ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले  ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live