नाशिकमध्ये हुक्का पार्टीवर मध्यरात्री पोलिसांचा छापा

Nashik Police Raided Hukkah Party
Nashik Police Raided Hukkah Party

नाशिक: नाशिक(Nashik) शहरात कोविड संसर्गाचा वेग राज्यात सर्वाधिक आहे.असे असताना अनेक फार्महाउस हॉटेलमध्ये प्रशासनाने आखून दिलेल्या निर्बंधांचा सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: जिल्ह्यातील फार्म हाऊस, मोठमोठी हॉटेल्स आणि बार मध्ये हा प्रकार सुरू आहे. गंगापूर (Gangapur Dam) धरणालगतच्या उच्चभ्रू खासगी फार्महाऊस मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर काल मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. Nashik Police Raided Hukkah Party Yesterday Night

मध्यरात्री सुरू असलेल्या या पार्टीत अचानक क्राईम ब्रँचचे (Crime Branch) अधिकारी पोलिस अधीक्षक सचीन पाटील (Nashik Police )यांच्यासह पहाटे दोन वाजता पोलिस पथक संबंधित फार्म हाऊस वर आले. तेव्हा तिथे उच्चभ्रू कुटुंबातील ३० ते ४० तरूण -तरूणी हुक्का पार्टीत (Hukkah Party) मश्गूल असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पहाताच या तरूणाईची ‘हुक्की’ उतरली आहे. पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य जप्त केले आहे. व सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले, फार्म हाऊस मालक आणि सर्व कर्मचाऱ्यांनावर 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.   Nashik Police Raided Hukkah Party Yesterday Night

शहर व जिल्ह्यात कोविड (Covid 19) संदर्भातले नियम सर्वसामान्य काटेकोरपणे पालन करत असताना अनेक हॉटेल्स बार मात्र आपल्या व्यवसायाचा अट्टाहास सोडत नाहीत.  हे सातत्याने दिसून येत आहे, नागरिक काही स्वतःवर नियंत्रण करत नाहीत अशी परिस्थिती आहे. उघडकीस आलेल्या या घटनेने शहरालगतच्या ग्रामीण भागात दररोज चालणारा तरूणाईचा धुडगूस पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कोरणा बाबत काळजी घेण्याची जबाबदारी आता स्वतः नागरिकांची आहे मात्र नागरिकच नियम पाळत नसतील तर प्रशासन(Government) करणार काय असा प्रश्न या निमित्ताने विचारला तर गरज आहे,ती लोकांनी स्वतःहून आपली बंधन पाळण्याची. 

Edited By-Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com