या दोन बालकांना यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

या दोन बालकांना यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

यंदाच्या वर्षी परेल परिसरात राहणारी १० वर्षी झेन सावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील हातमाली गावातील १५ वर्षी आकाश खिल्लारे यांना २०१९ चा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  महाराष्ट्रातील दोन वीर बालकांना यंदा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. औरंगाबादच्या आकाश खिल्लारेने एका पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला होता. आकाश शाळेत जात असताना त्याला बुडणाऱ्या माय लेकी दिसल्या. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता या दोघींना वाचवलं होतं.

पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.१९५७ पासून २६ जानेवारीच्या पुर्वसंध्येला देशातील वीर बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. 


मुंबईतील क्रिस्टल टॉवर या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेत तिने  जागरुकता दाखवत १३ जणांचे प्राण वाचवले होते. आग लागल्याने धुराचे लोट पसरतात.ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. अशावेळी गुदमरुन मृत्यू टाळण्यासाठी व्यक्तीच्या तोंडावर ओले कापड ठेवल्यास श्वास घेण्यास त्रास होत नाही. या शाळेतून मिळालेल्या धड्यातून झेन सदावर्तेने १३ जणांचे प्राण वाचवले होते.


Web Title:national bravery award to Akash Machindra Khillare and Zen Sadavarte two children from maharashtra

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com