कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon वरून 1 टन ड्रग्सची तस्करी; रॅकेटचा पर्दाफाश!

शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साईट म्हणजेच अ‍ॅमेझॉनवरून चक्क एक टन अंमली पदार्थाची तस्करी Drugs Smuggling करण्यात आली आहे.
कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon वरून 1 टन ड्रग्सची तस्करी; रॅकेटचा पर्दाफाश!
कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon वरून 1 टन ड्रग्सची तस्करी; रॅकेटचा पर्दाफाश! Saam Tv

नवी दिल्ली - सध्या सर्व वस्तू या ऑनलाईन भेटतात. कुठेही न जाता घरी बसून वस्तू ऑनलाईन ऑर्डर करता येतात. त्यामुळे आपण ऑनलाईन वस्तू मागवण्यासकडे अधिक पसंती देत असतो. ई-कॉमर्स कंपन्या देखील विविध प्रकारच्या ऑफर्स आणि स्वस्त दरात ग्राहकांना ऑफर्स देऊन आकर्षित करत असतात. पण कधीकधी याद्वारे अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात हे आपण ऐकत असतो. तर काही जण या ऑनलाईन पद्धतीचा चुकीचा वापर करून फसवणूक करत असतात. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशामध्ये आता समोर आली आहे. शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साईट म्हणजेच अ‍ॅमेझॉनवरून चक्क एक टन गांजाची तस्करी Drugs Smuggling करण्यात आली आहे. पोलिसांनी या ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आणि दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे, हुशार आरोपीने कढीपत्त्याच्या नावाने थेट गांजाची विक्री केली आहे. तस्करीबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मध्य प्रदेशातील भिंडमध्ये शनिवारी ऑनलाईन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तर या टोळीच्या दोन सदस्यांना अटक करण्यात यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह SP Manoj Kumar Singh यांनी माहिती मिळाल्यावर कल्लू पवैया (वय 30) आणि ढाबा मालक बृजेंद्र तोमर (वय 35) यांना शनिवारी भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक केली आहे. आरोपींकडून जवळपास 20 किलो गांजा (अंमली पदार्थ) जप्त करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.

कढीपत्ता विक्रीच्या नावाखाली गांजा तस्करी!

ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आरोपी कल्लूने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा चक्क आयात केला जात होता. या व्यवसायात बृजेंद्र हा कल्लूला मदत करत असे. कल्लूने आतापर्यंत एक टन गांजा विकला आहे आणि त्याद्वारे एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे" अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com