Mann Ki Baat 100 Episodes: PM मोदींच्या 'मन की बात'चा रविवारी १०० वा भाग; सरकारकडून जारी होणार १०० रुपयांचं नाणं, जाणून घ्या खास वैशिष्टे

PM Narendra Modi Mann ki Baat 100 Episodes: हा भाग प्रसारित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी (BJP) विशेष प्रयत्न करत आहे..
PM Narendra Man ki Baat
PM Narendra Man ki BaatSaam Tv

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचे 100 वा भाग लवकरच पुर्ण होणार आहे. मन की बातचा हा भाग खूपच विशेष असणार आहे. कारण 100 व्या भागानिमित्त मोदी सरकारने 100 रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाग एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच 30 एप्रिल 2023 रोजी प्रसारित होणार आहे.

हा भाग प्रसारित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी (BJP) विशेष प्रयत्न करत असून एक लाखापेक्षा अधिक मंडळींना बूथवर 100 वा भाग ऐकता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

PM Narendra Man ki Baat
Kopargaon APMC Election : बाजार समितीत भाजप-राष्ट्रवादी-ठाकरे गटाची युती, अहमदनगरमधील अनोख्या युतीची चर्चा

कसे असेल १०० रुपयाचे नाणे..

पंतप्रधान मोदींच्या १०० व्या मन की बात (Maan Ki Baat) निमित्त जारी करण्यात येणारे हे १०० रुपयाचे नाणे खूपच खास असणार आहे. नाण्याची गोलाई 44 मिमी असून चांदी, तांबे, निकेल आणि जस्त या चार धातूंपासून हे नाणे तयार करण्यात येईल. नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ असणार आहे. त्याच्या खाली 'सत्यमेव जयते' असे लिहिलेले असेल. डाव्या बाजूस देवनागरीमध्ये 'भारत' तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये 'India' असं लिहिलेलं आहे.

नाण्याच्या मागच्या बाजूला 'मन की बात'च्या 100 व्या भागाचं प्रतिक असलेलं खास चिन्ह असणार आहे. मायक्रोफोनचं चित्र आणि त्यावर 2023 असे लिहिलेले असेल. तसेच या चित्राच्या वरच्या बाजूला देवनागरीमध्ये 'मन की बात 100' आणि इंग्रजीत 'Mann Ki Baat 100' असं लिहिण्यात आलं आहे. तसेच या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असणार आहे.

PM Narendra Man ki Baat
Shambhuraj Desai News : संजय राऊतांना काय काम नाही, हवेतल्या गप्पा मारायच्या एवढचं त्यांना जमतं : शंभूराज देसाई

यापुर्वीही जारी केले होते १०० रुपयांचे नाणे...

दरम्यान, या पुर्वीही अनेकदा १०० रुपयांच नाणे सरकारकडून जारी करण्यात आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांसाठी 100 रुपयांचे नाणे जारी केले होते. तसेच राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 रुपयांचे स्मरणीय नाणे जारी केले होते. त्याचबरोबर

AIADMK चे संस्थापक एमजी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि महाराणा प्रताप यांच्या 476 व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते. यापूर्वी 2010, 2011, 2012, 2014 आणि 2015 मध्येही 100 रुपयांची नाणी जारी करण्यात आली होती. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com