सेल्फी घेणे पडले जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू

वीज कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ११ जणांचा मृत्यू हा एकट्या जयपूर मध्ये झाले आहे.
सेल्फी घेणे पडले जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू
सेल्फी घेणे पडले जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यूSaam Tv

राजस्थान : वीज कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ११ जणांचा मृत्यू हा एकट्या जयपूर Jaipur मध्ये झाले आहे. जयपूर, ढोलपूर Dholpur, कोट्टा Kuotta व जहालवार जिल्ह्यांमधील काल झालेल्या मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. यावेळी विजांच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस कोसळले आहे. राजस्थानमधील वेगवगळ्या विभागामध्येमध्ये वीज पडल्याने १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. 11 killed in lightning strike

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आमेर Amer महलाजवळच वॉच टॉवरवरती वीज कोसळली आहे. या ठिकाणी पावसात सेल्फीसाठी selfies जाणाऱ्या ११ पर्यटकांचा मृत्यू वीज कोसळल्याने झाले आहे. तर १६ जण गंभीर अवस्थेत जखमी झाले आहेत. वॉच टॉवरवर सेल्फी घेत असताना, विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने, त्यावेळेस सेल्फीसाठी वर गेलेले सर्व पर्यटक खाली पडले.

हे देखील पहा-

जयपूरचे पोलिस Police आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जणांचा मृत्यू आणि १६ जण जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, अन्य जखमींच्या शोध बचावकार्य घेत आहे. राजस्थान Rajasthan, उत्तर प्रदेश Uttar Pradesh व मध्य प्रदेश Madhya Pradesh मधील विविध ठिकाणी वीज पडल्याने ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील विविध ठिकाणी वीज पडून ३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. 11 killed in lightning strike

सेल्फी घेणे पडले जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू
तेलंगणातील तलावात नांदेडच्या दोन सख्ख्या बहिणींसह तिघींचा मृत्यू; सेल्फी काढतांनाची घटना

राजस्थानमध्ये २० जणांनी वीज पडून आपले प्राण गमावल आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार मध्य प्रदेश मध्ये वीज पडून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व राज्यपाल कलराज मिश्रा यांनी या दुर्घटने मध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केले आहे. मृताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर देखील करण्यात आली आहे.

गहलोत यांनी देखील ट्विट केले आहे की, कोटा, धोलपूर, झालावाड़, जयपूर व बारान या ठिकाणी वीज कोसळल्याने जीवितहानी झालेली आहे. ते म्हणाले आहे की, पीडित कुटुंबियांना लवकरच मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनीही उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील या घटने बाबत शोक व्यक्त केले आहे. मोदी यांनी देखील ट्विट करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. 11 killed in lightning strike

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com