UP Election 2022: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

विधानसभा निवडणुकात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील राजकीय वातावरण चांगले तापले आहे.
UP Election 2022: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
UP Election 2022: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातSaam Tv News

वृत्तसंस्था: विधानसभा निवडणुकात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ३ मार्चला ६ टप्प्यात मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. याकरिता प्रसाचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. ६ टप्प्यामध्ये ५७ जागाकरिता मतदान होणार आहे. यामध्ये गोरखपूर (Gorakhpur) मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदार संघातून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) निवडणूक लढवत आहेत. (12 candidates fray against Chief Minister Yogi Adityanath)

हे देखील पहा-

गोपखपूर हा भाजपचा (BJP) गड मानला जातो. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात या मतदारसंघामधून १२ उमेदवार निवडणूक (Election) लढवत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १९९८ ते २०१७ पर्यंत गोरखपूर मतदारसंघामधून खासदार राहिले आहेत. १९९८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपचे उमेदवार म्हणून, येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये ते अगदी कमी फरकाने विजयी झाले होते. यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाचे अंतर वाढत आहे. १९९९ ते २०१४ मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले आहेत.

UP Election 2022: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Beed Crime: नात्याला काळीमा! बीडमध्ये भावाचा बहिणीवर चाकू हल्ला

गोरखपूर जिल्ह्यात सर्वत्र ९ विधानसभा जागाकरिता एकूण १०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. गोरखपूरच्या जागेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधामध्ये एकूण १२ उमेदवार आहेत. हे १२ उमेदवार बहुतांशी राजकारणामधील नवे खेळाडू आहेत. समाजवादी पार्टीने गोरखपूरमधून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी शुभवती शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. तर बहुजन समाज पक्षाकडून ख्वाजा शमसुद्दीन आणि काँग्रेसकडून चेतना पांडे रिंगणात उतरले आहेत. यावेळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण आझाद समाज पक्षाशी खेळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com