मुंबईसह पाण्यात बुडणार ही 12 शहरे; NASA चा खळबळजनक रिपोर्ट

या शहरांना येणाऱ्या काही वर्षांमध्ये धोका असल्याची शक्यता आहे.
मुंबईसह पाण्यात बुडणार ही 12 शहरे; NASA चा खळबळजनक रिपोर्ट
मुंबईसह पाण्यात बुडणार ही 12 शहरे; NASA चा खळबळजनक रिपोर्टSaam Tv

वृत्तसंस्था : सध्या जगभरात कोरोनाचे Corona संकट आहे. यातच आता आणखी एका संकटाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. हे संकट म्हणजे मुंबईसह Mumbai हे 12 शहरं पाण्यात बुडणार आहे. अमेरिकी American अंतराळ संस्था नासा NASA आणि इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने IPCC यांनी हा खळबळजनक रिपोर्ट जारी केला आहे. वैज्ञानिक Scientist वारंवार आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजेच जागतिक तापमानवाढी विषयी माहिती सांगत असतात.

काही दिवसांअगोदर याबाबत आणखी एक अहवाल जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये इसवी सन २१०० पर्यंत म्हणजे अवघ्या ७९ वर्षांमध्ये जगाच्या तापमानामध्ये ४.४ डिग्री 2100 सेल्सिअसने वाढ होणार आहे. यामुळे दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवरचा बर्फ वितळून जगात अनेक ठिकाणची जमीन पाण्याखाली जाणार आहे. यामध्ये भारतामधील समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या १२ शहरांचा समावेश आहे.

हे देखील पहा-

ही शहरे सुमारे ३ फूट पाण्याखाली जाणार आहे, असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. नासाने एक सी लेव्हल प्रोजेक्शन टूल बनवले आहे. या टूलमध्ये जगाचा नकाशा दिला आहे, ज्यामध्ये दाखवले आहे, की कोणत्या वर्षी जगात, कोणत्या भागात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. यामध्ये भारत देशामधील कोची, गोव्यातला मारमुगाव किनारा, भावनगर, मुंबई, ओखा, तुतीकोरीन, पारादीप, मँगलोर, चेन्नई आणि विशाखापट्टणम या शहरांना येणाऱ्या काही वर्षांमध्ये धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे.

या शहरांमधील पाणी पातळी येणाऱ्या १० वर्षांमध्ये २ ते ७ इंचांनी, तर येत्या ८० वर्षांमध्ये सुमारे ३ फुटांनी वाढणार आहे. या सर्व शहरांच्या आजूबाजूला अनेक बंदरे आहेत. ही बंदरे व्यापाराच्या दृष्टिने महत्त्वाची आहेत. तसेच या शहरांत लोकवस्ती देखील मोठ्या प्रमाणात असल्याने आयपीसीसीचा इशारा गंभीर समजला जात आहे. आयपीसीसीने IPCC आपल्या अहवालात म्हटले जात आहे की, १८५० नंतर ४ दशकांमध्ये जेवढे तापमानवाढ झालेली नव्हती.

त्याहून जास्त तापमानवाढ मागील ४ दशकांमध्ये झाली आहे. तसेच याअगोदर जी उष्णतेची लाट दर ५० वर्षांनी येत होती. ती आता दर १० वर्षांनी येत असल्याचे तज्ज्ञांनी यावेळी सांगितले आहे. दरवर्षी जगभरात सुमारे ४ कोटी टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते, हे थांबले नाही, तर पुढील २ दशकांमध्येच जगाचे तापमान १.५ डिग्री सेल्सिअसने वाढेलेले राहणार आहे, असा इशारा आयपीसीसीने यावेळी दिला आहे.

मुंबईसह पाण्यात बुडणार ही 12 शहरे; NASA चा खळबळजनक रिपोर्ट
कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रित डोसाचे उत्तम परिणाम? ICMR चा दावा

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, टर्की किंवा कॅनडा या देशांमधील जंगलांना आग लागण्याच्या घटना जागतिक तापमान वाढीमुळे होत आहे. एकीकडे जंगले जळून खाक होत आहेत, तर दुसरीकडे समुद्राची पातळी वाढत आहे. यामुळे काही वर्षांमध्ये कित्येक देशांचा बराचसा भाग पाण्याखाली गेला असणार आहे. बाकी भागामध्ये झाडांचे प्रमाण असल्याने, राहण्यास अडचण येत आहे.

यामुळे २०५० पर्यंत प्रदूषणावर आवर घालून, कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हे ५०० कोटी टनपर्यंत खाली आणणे आवश्यक राहणार आहे. अन्यथा आपणच करत असलेले प्रदूषण आपल्यासाठी आणि पृथ्वीवर इतर जीवांसाठी घातक राहणार आहे, असे या अहवालाचे प्रमुख लेखक फ्रेडरिको ओट्टो यांनी सांगितले आहे. ते ऑक्सफोर्ड विद्यापीठात संशोधक आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com