मेघालयात १२ आमदार काँग्रेसला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये

काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मेघालयात १२ आमदार काँग्रेसला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये
मेघालयात १२ आमदार काँग्रेसला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये Saam Tv

नवी दिल्ली - मेघालयमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा (Mukul Sangma) यांच्यासह इतर ११ आमदारांना काँग्रेसला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या (Congress) १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगालनंतर (West Bengal) मेघालय हे आता दुसरे राज्य आहे ज्या ठिकणी तृणमूल काँग्रेसचे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आहेत.

हे देखील पहा -

राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विंसेट यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर ही मोठी राजकीय उलथापालथ मेघालयमध्ये पहायला मिळत आहे.सप्टेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. मात्र, ही बैठक कधी झाली, याबाबत दोन्ही पक्षांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र, त्यांची भेट झाल्याचे संगमा यांनी निश्चितपणे सांगितले होते.

मेघालयात १२ आमदार काँग्रेसला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये
उल्हासनगर मध्ये मोटार सायकल चोर अटक, तीन मोटारसायकल जप्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमचे सदस्य काँग्रेस सदस्यांच्या संपर्कात होते. मात्र संगमा यांनी तृणमूल काँग्रेसला कोणताही शब्द दिला नव्हता. सप्टेंबरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संगमा यांनी आपण पक्षात राहून नव्याने काम करु असे सांगितले होते. दरम्यान याआधी २३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते कीर्ती आझाद, हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि दिग्गज नेते अशोक तंवर, जनता दल (युनायटेड)चे माजी सरचिटणीस पवन वर्मा यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com