कोरोनाचा आलेख किंचित घसरला! देशात 24 तासांत 12 हजार 899 नवीन कोरोनाबाधित

11 जून ते 17 जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे. ही चिंताजनक बाब आहे.
कोरोनाचा आलेख किंचित घसरला! देशात 24 तासांत 12 हजार 899 नवीन कोरोनाबाधित
India Corona CasesSaam Tv

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णात लक्षणीय वाढ झाली. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 12 हजार 899 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र (Maharashtra) आणि दिल्लीमध्ये (Delhi) गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हे देखील पाहा -

सध्या देशात एकूण 72 हजार 474 सक्रिय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर 8 हजार 518 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या किंचित घसरली आहे. आदल्या दिवशी 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. 11 जून ते 17 जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे. ही चिंताजनक बाब आहे.

India Corona Cases
चंद्रकांत बढे पतसंस्था घाेटाळा प्रकरण; अध्यक्षांसह सात संचालक अटकेत, पाेलीस काेठडीत रवानगी

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. गेल्या 3,883 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 2808 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.85 टक्के एवढे आहे. तर गेल्या 24 तासात एकूण 2,802 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण दोन कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आज एकूण 22,828 सक्रिय रुग्ण संख्या आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com