पालकांनो सावधान ! तुमचा मुलगा ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेला असेल तर..

ऑनलाइन गेममधील शस्त्रे खरेदी करण्यासाठी मुलाने 20 हजरांची चोरी केली. इतकेच नाही तर त्याने आईचे दागिनेही चोरले
पालकांनो सावधान ! तुमचा मुलगा ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेला असेल तर..
पालकांनो सावधान ! तुमचा मुलगा ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेला असेल तर.. saam tv

अलिगड: ऑनलाईन गेम्सच्या (Online Games) व्यसनामुळे मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे एक प्रकरण अलीगडमधुन (Aligadh) समोर आले आहे. दिल्लीच्या (Delhi) प्रीत विहारमध्ये राहणाऱ्या एका मुलाला ऑनलाइन गेमची इतकी सवय झाली आहे की, त्याने प्रथम गेममधील शस्त्रे (Weapons in the game) खरेदी करण्यासाठी वडिलांच्या खिशातून पैसे चोरले, नंतर आईचे दागिने विकले. गेल्या एका महिन्यातच त्याने 20 हजार रुपयांची शस्त्रे ऑनलाईन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने तो घरातून पळून गेला आणि दिल्लीहून कालिंदी एक्स्प्रेसमध्ये (Kalindi Express) चढला आणि अलीगड जंक्शनला (Aligarh Junction) पोहचला. जेव्हा प्रवाश्यांनी त्याला प्लॅटफॉर्मवर एकट्याला फिरताना पाहिले तेव्हा त्यांनी त्याची विचापुस करुन करुन रेल्वे संरक्षण बलाच्या ताब्यात दिले. आरपीएफने त्यांला त्यांच्या कार्यालयात आणले. आरपीएफने जेव्हा त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने संपूर्ण सत्य सांगितले.

पालकांनो सावधान ! तुमचा मुलगा ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेला असेल तर..
कैद्यांचा जामिन मिळूनही जेलबाहेर जाण्यास नकार (पहा व्हिडिओ)

रेल्वे संरक्षण बलाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा हा 12 वर्षांचा असून दिल्लीतील एक प्रसिद्ध शाळेत शिकतो. त्याचे वडील स्नॅक्स, चिप्सचा व्यवसाय करतात. लॉकडाऊनमुळे वडिलांनी त्याला ऑनलाइन क्लाससाठी स्मार्ट फोन दिला होता. नंतर मुलाने फोनमध्ये ऑनलाइन लढाई गेम डाऊनलोड केल्या. हळू हळू त्याला त्या गेमची सवय लागली आणि गेम अद्यतनित (Update) करण्यासाठी त्याने ऑनलाईन शस्त्रे खरेदी करण्यासाठी त्याने आपल्या वडिलांच्या खिशातून पैसे चोरणे सुरू केले. त्याच्याच भागात राहणारा एक तरुण त्याच्या खात्यातून गेम खेळण्यासाठी ऑनलाईन शस्त्रे खरेदी करून द्यायचा आणि त्या बदल्यात मुलाकडून पैसे घ्यायचा.

पालकांनो सावधान ! तुमचा मुलगा ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेला असेल तर..
कोथरूड ते आनंद नगर मेट्रो रुळावरून धावली; अंतर्गत चाचणी यशस्वी

धक्कादायक म्हणजे त्याने ऑनलाइन गेममध्ये शस्त्रे खरेदी करण्यासाठी त्याच्या आईचे दागिने चोरले आणि जवळील ज्वेलर्सकडे विकले. त्याने मिळालेल्या पैशांसह शस्त्रे देखील ऑनलाइन खरेदी केली. एका महिन्यातच त्याने 20,000 रुपयांची शस्त्रे ऑनलाईन खरेदी केली. घरातील दागिने हरवल्याची माहिती जेव्हा त्याच्या आईच्या लक्षात आली तेव्हा घराची मोठी झडती घेण्यात आली. आपण पकडले जाऊ या भीतीने तो घराबाहेर पडला आणि नवी दिल्ली स्थानकात पोहोचला आणि तेथून तिकिटाविना कालिंदी एक्स्प्रेसमध्ये चढला.

ट्रेन अलिगड जंक्शनला पोचल्यावर तो इथून खाली उतरला आणि दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर फिरू लागला. त्याच्या फिरण्याचा व्हिडिओही रेल्वे सीसीटीव्हीमध्ये नोंदविला गेला आहे. दरम्यान प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी एक मुलगा एकटाच फिरत असल्याची माहिती आरपीएफला दिली, त्यानंतर आरपीएफने त्याला पोलिस ठाण्यात नेले, त्याची चौकशी केली असतं त्याने संपूर्ण हकीकत पोलिसांना दिली. त्याने आपल्या वडिलांचा मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर मुलाच्या पालकांना बोलावण्यात आले आणि समुपदेशनानंतर मुलाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com