योगी सरकारच्या आदेशाचा परिणाम; 125 लाऊडस्पीकर हटवले

लाऊडस्पीकरच्या संदर्भात देशभरात वाद सुरू झाला आहे
Loudspeaker Controversy Latest Marathi News, UP Latest Marathi News
Loudspeaker Controversy Latest Marathi News, UP Latest Marathi NewsSaam Tv

वृत्तसंस्था: लाऊडस्पीकरच्या संदर्भात देशभरात वाद सुरू झाला आहे आणि यातच, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) योगी सरकारने (government) धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या आदेशानंतर आतापर्यंत 125 लाऊडस्पीकर (loudspeakers) खाली करण्यात आले असून 17 हजार लोकांनी स्वतहून लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार की, राज्यातील धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याचा आदेश जारी करण्यात आला. (Loudspeaker Controversy Latest Marathi News)

हे देखील पाहा-

यासंदर्भात ३० एप्रिलपर्यंत अनुपालन अहवाल मागविण्यात आला आहे. पोलिसांना (police) धार्मिक नेत्यांशी समन्वय साधून आणि बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ते म्हणाले. त्याचवेळी, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले आहे की, आतापर्यंत 125 लाऊडस्पीकर काढण्यात आले आहेत आणि 17 हजार लोकांनी लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे.

Loudspeaker Controversy Latest Marathi News, UP Latest Marathi News
घरामागे खरकटं अन्न टाकल्यानं आला राग, महिलेची वृद्ध दाम्पत्याला मारहाण

मुख्यमंत्री योगी यांनी दिला आदेश

पुढील महिन्यात एकाच दिवशी येणारा ईद आणि अक्षय्य तृतीया आणि इतर अनेक महत्त्वाचे धार्मिक सण पाहता सणांमध्ये माईकचा वापर करता येईल, असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी दिले होते. माईकचा आवाज त्या आवारातून बाहेर जाणार नाही. इतर लोकांची गैरसोय होऊ नये आणि नवीन कार्यक्रम आणि नवीन ठिकाणी माईक लावू देऊ नये, असा त्यांचा आग्रह होता. सीएम योगी म्हणाले होते की, मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रम परवानगीशिवाय काढू नये आणि परवानगी देण्यापूर्वी आयोजकांकडून शांतता आणि सलोखा राखण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. पारंपारिक धार्मिक मिरवणुकांनाच परवानगी द्यावी, नवीन कार्यक्रमांना अनावश्यक परवानगी देऊ नये, असे ते यावेळी म्हणाले होते. केवळ यूपीमध्येच नाही तर देशातील इतर राज्यांमध्येही लाऊडस्पीकरबाबत नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com