Boy Dies after Dog Bite : कुत्रा चावल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, अ‍ॅम्ब्युलन्समध्ये वडिलांच्या कुशीत तडफडून सोडला जीव

Uttar Pradesh News : मुलाचे वडील त्याला घेऊन अनेक रुग्णालयांमध्ये फिरत होते.
Dog Bite
Dog BiteSaam tv

Uttar Pradesh News :

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्यानंतर दीड महिन्यांनी एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रेबीजमुळे तीन दिवसांपूर्वी मुलाची प्रकृती बिघडली होती.

मुलाचे वडील त्याला घेऊन अनेक रुग्णालयांमध्ये फिरत होते. परंतु डॉक्टरांनी उपचारासाठी असमर्थता दर्शवली. अखेर सोमवारी अॅम्बुलन्समध्ये वडिलांच्या कुशीत मुलाने तडफडून जीव सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या चरणसिंह कॉलनीमध्ये शाहवेज (१४ वर्ष) राहत होता. चार दिवसांपूर्वी म्हणजे 1 सप्टेंबरपासून शाहवेजला विचित्र त्रास सुरू झाला. पाण्याची त्याला अचानक भीती वाटू लागली. त्याने खाणे-पिणे सोडले होते. भुंकण्यासारखा आवाज तो काढत होता.

Dog Bite
Girl Dies Due to Dengue : कल्याणमध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू, परिसरात भीतीचं वातावरण

त्यानंतर घाबरलेल्या कुटुंबियांनी त्याला डॉक्टरकडे नेले. त्यावेळी त्याला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतल्याची बाब समोर आली. ज्याचं इन्फेक्शन आता संपूर्ण शरीरात पसरलं होतं. डॉक्टरांना त्याला रेबिज झाल्याचं सांगितलं. तब्येत बिघडल्यानंतर त्याला गाझियाबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र इन्फेक्शन जास्त असल्याने डॉक्टरांना त्याला दिल्लीला शिफ्ट करण्यास सांगितलं. त्यानंतर शाहवेजला त्याच्या कुटुंबियांनी त्याला जीटीबी आणि एम्समध्ये दाखल केलं. मात्र त्याला उपचार करण्यास उशीर झाला होता.  (Latest News Update)

Dog Bite
INDIA or BHARAT : ''इंडिया' नव्हे भारत? नामांतर पाकिस्तानच्या पथ्यावर पडणार? पाकिस्तान करु शकतो मोठा दावा

मुलाच्या आजोबांच्या माहितीनुसार दीड महिन्यापूर्वी शेजाऱ्यांच्या पाळीव कुत्र्याने त्याला चावा घेतला होता. मात्र भीतीपोटी त्याने ही गोष्ट घरात सांगितली नाही. त्यामुळे त्याला त्वरित उपचार मिळाले नाही. ज्यावेळी लक्षणे दिसू लागली तेव्हा ही गोष्ट समोर आली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com