राजस्थान हादरलं! 15 वर्षीय मूकबधिर मुलीवर गँगरेप करुन फेकलं रस्त्यावर

आरोपींना शोधण्यात पोलिसांना आतापर्यंत तरी अपयश आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस आजूबाजूच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
राजस्थान हादरलं! 15 वर्षीय मूकबधिर मुलीवर गँगरेप करुन फेकलं रस्त्यावर
15 Year Minor Girl Sexually AssaultedSaam TV

राजस्थान: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात (Alwar District) 15 वर्षांच्या मूकबधिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार (15 Year Minor Girl Sexually Assaulted) करून तिला रक्तबंबाळ अवस्थेत महामार्गावर फेकून देण्यात आले होते. या घटनेची तीव्रता एवढी आहे की दिल्लीतील निर्भया प्रकरण डोळ्यासमोर आलं. सध्या पीडित अल्पवयीन मुलीला अलवर येथून जयपूरच्या जेके लोन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच राज्य बाल आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनिवाल, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री टिकाराम जुली, महिला व बालविकास मंत्री ममता भूपेश यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अलवर पोलिसांनी (Alwar Police) सांगितले की, पीडितेवर जयपूरमध्ये उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ अरविंद शुक्ला यांनी सांगितले की, सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे, आम्ही ऑपरेशन करत आहोत, ज्यामध्ये प्लास्टिक सर्जन, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. धारदार वस्तूने तरुणीला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

15 तास झाले तरी आरोपी मोकाट...

आरोपींना शोधण्यात पोलिसांना आतापर्यंत तरी अपयश आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस आजूबाजूच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, तर आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे. मात्र घटनेला 15 तासांहून अधिक काळ लोटला तरी पोलिसांचे हात अजूनही रिकामेच आहेत. अलवरचे पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची तात्काळ 5 पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. सोबतच या प्रकरणी जलदगतीने कारवाई करण्यासाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी, पीडित अल्पवयीन मुलीला 3.50 लाख रुपयांची सहाय्य रक्कम जारी केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

15 Year Minor Girl Sexually Assaulted
UP: तंदुरी रोटीवर थुंकून स्वयंपाक केल्याचा किळसवाणा प्रकार, Video व्हायरल!

मुलीचे प्राण वाचवणे हे आमचे प्राधान्य: ममता भूपेश

जेकेलॉन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या मंत्री ममता भूपेश यांनी सांगितले की, आमचे सरकार मुलीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे मंत्री म्हणाले. राजस्थान सरकार शून्य सहनशीलतेवर काम करते. भूपेश पुढे म्हणाल्या की, अशा गुन्ह्यांमध्ये सरकारसोबतच मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे लागणार आहे. दुसरीकडे, राजस्थान बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनिवाल यांनीही या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आणि बलात्कारातील आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची विनंती सरकारला केली आहे.

तीन दिवसांत तीन घटनांनी राजस्थान हादरले

महिला, मुली, मुलींवरील अत्याचार आणि गुन्ह्यांमध्ये आपला कायदा कडक असूनही अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या तीन दिवसांत महिला गुन्हेगारीच्या तीन घटनांनी राजस्थान हादरले आहे. एका घटनेत बलात्कारानंतर हत्या, तर दुसऱ्या घटनेत गँगरेपने जखमी झालेल्या तरुणीची आत्महत्या आणि आता एक मुलगी आता पुन्हा आयुष्याशी झुंज देत आहे.

8 जानेवारी रोजी जयपूरच्या तुंगा पोलीस स्टेशन परिसरात एका विहिरीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता, त्यावर पोलिसांनी सांगितले की, महिलेची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान घटनास्थळी सापडलेल्या महिलेच्या चप्पलच्या आधारे आरोपी राजू मीणा याला अटक केली होती.

त्याचबरोबर भरतपूर जिल्ह्यातील कैथवाडा पोलीस स्टेशन परिसरात सामूहिक बलात्कारातील अल्पवयीन पीडितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. कैथवाडा पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, पीडितेसोबत बराच काळ सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्याचबरोबर मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याची बाबही समोर आली आहे.

अलवर शहरातील शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री तिजारा पुलावर एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची ओळख पटवली असून ती अलवर जिल्ह्यातील मालाखेडा पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी सायंकाळी 4 वाजल्यापासून बेपत्ता होती.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com