President Droupadi Murmu: माझ्यासाठी सार्वजनिक हित सर्वोपरी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशाच्या १५व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आज शपथ घेणार आहेत.
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSaam Tv

देश अमृत महोत्सव साजरा करत आहे: द्रौपदी मुर्मू

देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. सर्वोच्च पद बहाल केल्याबद्दल धन्यवाद.

माझ्यासाठी सार्वजनिक हित सर्वोपरी: द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या की, मी ओडिशातील एका गावातून जीवन प्रवास सुरू केला आहे. हे पद माझे नाही तर देशातील गरिबांचे कर्तृत्व आहे. लोकशाहीच्या बळावर मी इथंपर्यंत पोहोचली आहे. मला अभिमान वाटत आहे. माझ्यासाठी सार्वजनिक हित सर्वोपरी आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये केले पहिले भाषण

द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती म्हणून पहिले भाषण केले.

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली

द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीला सुरुवात

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे.

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद भवनात पोहोचल्या

मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद भवनात पोहोचल्या. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, CJI रमणा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निवडून आलेल्या राष्ट्रपतींचे स्वागत केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच शपथ घेणार

मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनातून संसदेसाठी निघाले आहेत. मुर्मू लवकरच भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीला थोड्याच वेळात सुरुवात

राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वागत केले. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आज शपथ घेणार आहेत. ही शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश देणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com