धक्कादायक! दिल्लीत तीन मजली इमारतीला भीषण आग; १६ जणांचा मृत्यू

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला आग लागली.
Delhi Fire News
Delhi Fire NewsSaam Tv

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग (Fire) लागली. या आगीत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचाव कार्यादरम्यान, हायड्रोलिक क्रेनच्या साह्याने आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना एका महिलेचा मृत्यू झाला.

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला आग (Fire) लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४.४० च्या सुमारास ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मेट्रो स्टेशनच्या ५४४ क्रमांकाच्या खांबाजवळ असलेल्या इमारतीला आग लागली असून ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Delhi Fire News
काँग्रेसने अनेकवेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला; जयंत पाटलांचा नाना पटोलेंना टोला

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पश्चिम दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग (Fire) लागली. पोलिसांनी इमारतीतून ६०-७० लोकांना बाहेर काढले होते. काही लोक अजूनही आत अडकल्याचेही त्यांनी सांगितले. आगीची माहिती दुपारी ४.४० च्या सुमारास मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यापूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला असून, तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com